जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले

By Admin | Updated: July 20, 2015 23:12 IST2015-07-20T23:12:47+5:302015-07-20T23:12:47+5:30

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ११ बैलांची सुटका.

Traffic Vehicle Traffic Vehicle | जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले

जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले

मोताळा (जि. बुलडाणा): अवैधरित्या गुरांची वाहतूक करून नेत असतांना जनावरांसह आयशर वाहन पोलिसांनी पकडल्याची घटना तरवाडी फाट्यावर सकाळी ११ वाजता घडली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडीकीस आलेल्या या घटनेमध्ये ११ बैलांना अवैधरित्या नेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तरवाडी येथील ग्रामस्थांना पिंपळगाव राजा व नांदुर्‍याच्या बाजारात एका ट्रकमध्ये काही जनावरांना विकण्यासाठी नेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ट्रक आडवीला असता, आयशर वाहन क्रमांक एम. एच. ४२ टी ७४७४ मध्ये जनावरे आढळून आले. याची माहिती ग्रामस्थांनी तत्काळ बोराखेडी पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर चालक शे. रिजवान शे. सुलतान (वय २२) रा. धाड याच्या विरूध्द कलम ६६/१९२ नुसार कारवाई केली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Traffic Vehicle Traffic Vehicle