शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

टिळक स्मारक महिला मंडळाने संस्कार रुजविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 3:55 PM

खामगाव येथे टिळक स्मारक महिला मंडळाचा शताब्दी महोत्सव शनिवारी थाटात पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सध्या घरे मोठी झाली असली, तरी मनातील जागा लहान झाली आहे. अशा अवस्थेत टिळक स्मारक महिला मंडळाने संस्कार रूजविण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले. खामगाव येथे टिळक स्मारक महिला मंडळाचा शताब्दी महोत्सव शनिवारी थाटात पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. जोशी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य मंडळाचे सदस्य डॉ.गजानन नारे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विलास देशपांडे, उत्सव प्रमुख विद्या कावडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे उपस्थित होते. प्रास्ताविक उत्सव प्रमुख विद्या कावडकर यांनी केले.पुरूषांच्या हस्तक्षेपाशिवाय १०० वर्षे चालणारे टिळक स्मारक महिला मंडळ ही संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजना करण्यात आल्या. ‘लेक वाचवा’, ‘संस्कृती वाचवा’, वृध्दांची हेटाळणी थांबवा याबाबत मंडळाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. महिलांच्या अन्याय-अत्याचारा विरोधातही टिळक स्मारक महिला मंडळाने काम केले, असे विद्या कावडकर प्रास्ताविकात म्हणाल्या. संस्था चालविणे हे कठीण काम आहे; मात्र विचार, तन्मयता, प्रामाणिकपणाने टिळक स्मारक महिला मंडळाने सचोटीने आपले कार्य पुढे नेले.समाजात ३ प्रकारचे लोक असतात. काही लोक बोलतात, काही कामाचे बोलतात तर काहींचे काम बोलते. ज्यांचे काम बोलते, त्यांच्यापैकी टिळक स्मारक महिला मंडळ आहे, असे डॉ. नारे म्हणाले.दरम्यान, टिळक स्मारक महिला मंडळाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमाला टिळक स्मारक महिला मंडळाच्या अध्यक्ष सुषमा भाटे, सचिव श्वेता तारे, उपाध्यक्ष ज्योती खांडेकर, सहसचिव रेखा खानझोडे, सीमा देशमुख आदींसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावSocialसामाजिक