शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी राबतील हजारो हात !

By admin | Updated: November 12, 2014 00:03 IST

खामगाव नगराध्यक्षांचे प्रयत्न, मुख्याधिका-यांचा पुढाकार.

अनिल गवई / खामगाव(बुलडाणा)शहराला क्लीन सिटी, ग्रीन सिटी म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील विविध वार्डांमध्ये तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबविल्या जात आहे; मात्र या अभियानाला आणखी गतिशिल करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. त्यामुळे शहरातील नगरपालिका शाळांसह खासगी शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचीही स्वच्छतेसाठी मदत घेतल्या जाणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पालिका प्रशासन कामाला लागले असून, लवकरच हजारो हातांचा सहभाग घेऊन मोठे स्वच्छता अभियान शहरात राबविल्या जाणार आहे.खामगाव शहरात नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांच्या नेतृत्वात सुरूवातीपासूनच या अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, या अभियानात गतिशिलता आणण्यासाठी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, मुख्याधिकारी डी.ई.नामवाड यांच्यासह नगरपालिका कर्मचारी प्रयत्नरत आहेत. शहरातील खुली मैदाने, नगरपालिका शाळा, शाळांची मैदाने तसेच शाळेसभोवतालचा परिसर, खासगी दवाखाने, वार्डातील अंतर्गत रस्ते, सर्व्हिस गल्ली, सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्यांसह मुख्य रस्त्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्या जाणार आहे. नगरपालिका स्वच्छता कर्मचार्‍यांसह शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्यासह खामगाव शहरातील नगरपालिका शाळा, खासगी शाळांचाही सहभाग घेऊन शहराची जम्बो सफाई करण्याचा प्रयत्न आहे. स्वच्छतेचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे; मात्र बहुतांश नागरिक आपल्याकडील कचरा खुल्या जागेत टाकतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते. या पार्श्‍वभूमीवर शहर स्वच्छतेसाठी नियमित प्रयत्न केल्या जाणार आहे. लोकसहभागातून ही स्वच्छता मोहीम राबविली जाणार असल्याचे खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी सांगीतले.