हजारो एकरांवरील जंगल जळून खाक

By Admin | Updated: May 1, 2017 00:57 IST2017-05-01T00:57:59+5:302017-05-01T00:57:59+5:30

सोनोशी : येथून जवळच असलेल्या पिंपरखेड शिवारातील वन विभागाच्या अख्त्यारित असलेले जंगल जळून खाक झाले आहे. लाखो झाडे आगीने होरपळले असून, काही झाडे जळून खाक झाले आहेत.

Thousands of acres of forest burns | हजारो एकरांवरील जंगल जळून खाक

हजारो एकरांवरील जंगल जळून खाक

सोनोशी : येथून जवळच असलेल्या पिंपरखेड शिवारातील वन विभागाच्या अख्त्यारित असलेले जंगल जळून खाक झाले आहे. लाखो झाडे आगीने होरपळले असून, काही झाडे जळून खाक झाले आहेत.
पिंपरखेड येथील जंगलात लाखो झाडे आहेत. मात्र, आगीने ही झाडे होरपळून गेली आहेत. त्यामुळे ही आग लागली की लावली, जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर की प्रशासनाचे संगनमत या प्रश्नाची उत्तरे कोण देणार, हा प्रश्न पडला आहे. वन विभाग जंगलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून तत्पर नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे जंगल प्रत्येक वर्षी जाळल्या जात आहे. मात्र, कोणतीही उपाययोजना होत नाही. कर्मचारीही कधी जंगलात दिसत नाही.
जंगलात आग लागल्याने जंगलात वास्तव्यात असलेले हरीण, रोही, मोर यासारखे असंख्य प्राणी स्थलांतरित झाले आहेत. जंगल पूर्णपणे उजाड झाल्याने प्राण्याची सुरक्षा धोक्यात आली आहे. हजारो एकरावर पसरलेले हे जंगल, या जंगलात पिण्याची पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे हे जंगली प्राणी गावाकडे धाव घेतात. या सर्व गोष्टीमुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Web Title: Thousands of acres of forest burns