शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

मास्क न वापरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2021 12:02 PM

Buldhana News : त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यास तब्बल चार महिने जेरीस आणल्यानंतर आता कुठे कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन न केल्यास पुन्हा कोरोनाच्या लाटांचा सामना सर्वांनाच करावा लागणार आहे. परिणाम स्वरूप कोराना प्रतिबंधासाठी सांगितलेल्या त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.   त्यासाठीचा ॲक्शन प्लान जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपूते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना त्यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालायत ५ जूनला नियोजन सभागृहात कोरोना प्रतिबंध आढावा बैठकीत अनुषंगिक विषयान्वये त्यांनी हे निर्देश दिले आहेत.  फेब्रुवारी महिन्यापासून बुलडाणा जिल्ह्यास तिसऱ्या लाटेचा फटका बसण्यास प्रारंभ झाला होता. चालू वर्षात गेल्या पाच महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात ७१ हजार १७० व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जून महिन्यात हा आकडा घसरला असला तरी कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमुख कारण हे कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन न करणे हेच आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी तथा तत्सम ठिकाणी शारीरिक अंतराचे पालन करणे आणि नियमित हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचा विसर पडल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला होता.५ जूनच्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याची जाणीव उपस्थित अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा करून दिली आणि त्यानंतर येत्या काळातील कोरोनाच्या लाटा जर रोखायच्या असतील तर कोरोना प्रतिबंधासाठीच्या त्रिसूत्रीची सार्वजनिक ठिकाणी काटेकोर अंमलबजावणी होते की नाही यासाठी ॲक्शन प्लान तयार करण्यात यावा. सोबतच मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह अन्य काही कारवाई करता येते का? याचा आढावा घेऊन तसे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आता हे तिन्ही अधिकारी याबाबत काय नियोजन करतात याकडे सध्या लक्ष लागून आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणे