शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल चोरांना अटक करुन १९ मोटारसायकल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:00 IST

त्यांच्याकडून १९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पोलीसांना मोटारसायकल चोर तालुक्यातील चिखली सुर्वे रस्त्याकडून येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीव्दारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सापडा रचून त्यांना पकडल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. पोलीस तपासात पकडण्यात आलेले आरोपी अट्टल सायकलचोर असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून १९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात.
वाशिम शहरातील समता नगर , अल्लाडा प्लाट भागातून गत तीन दिवसापूर्वी चोरीस गेलेली मोटारसायकल घेवून शिवाजी राठोड व त्याचा मित्र बद्रीनारायण घुगे हे चिखली सुर्वे रस्त्याने येत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शिवाजी ठाकरे  यांनी आपले अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचारी यांना चिखली सुर्वे रोड पुढील कारवाई साठी रवाना केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, पोलीस उपनिरिक्षक भगवान पायघन व त्यांचे पथकातील कर्मचाºयांनी दोन्ही आरोपीस अडविले. या दोन्ही आरोपींची चौकशी केली असता मोटारसायकलवरील इसमांचे नाव शिवाजी रामदास राठोड, वय ५० वर्ष, रा. डोंगर खंडाळा, ता.जि.बुलढाणा, ह.मु. भास्कर बिल्डींग शासकीय कर्मचारी निवासस्थान वाशिम व बद्रीनारायण ज्ञानबा घुगे, वय ३९ वर्ष, रा. मांडवा ता.रिसोड जि. वाशिम ह.मु. सिव्हील लाईन वाशिम असे असल्याचे निष्पन्न झाले.  त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकल विषयी चौकशी केली असता त्यांनी तीन दिवसाआधी समतानगर अल्लाडा प्लॉट भागातुन चोरी केली असल्याची कबुली दिली. वरून सदर मोटारसायकल तपासात जप्त करण्यात आली व दोन्ही इसमांना गुन्हयात अटक केली.

जळगाव, नांदेड, अकोला, हिंगोली,वाशिम जिल्हयात चोरी
 शिवाजी रामदास राठोड याने  उदरनिवार्हासाठी प्रथम जळगाव येथुन नंतर नांदेड, अकोला, हिंगोली आणि वाशिम जिल्हयातुन १८ मोटारसायकल चोरी केल्या. चोरी केलेल्या मोटारसायकल  राठोड व त्याचा मित्र  घुगे यांनी वाशिम शहर व  परिसरात  विक्री केल्या काहिंना उसने पैसे पाहीजेत असे म्हणुन पैसे परत करे पर्यंत गाडी ठेवुन चोरी केलेल्या मोटारसायकलींची विल्हेवाट लावली.
राठोड समाजकल्याण विभागातील कर्मचारी
  शिवाजी राठोड याने पुर्वी वाशिम समाजकल्याण विभागात नोकरी केली . त्याची दोन वषार्पुर्वी जळगाव येथे वरिष्ठ काळजीवाहक पदावर बदली झाली . अपघात झाल्याने आजारी रजेवर होता. प्रकृती ठीक झाल्यानंतर त्याने रुजू न होता चोरी सुरु केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस