शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

देवपूर येथे दोन घरामध्ये चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:36 IST

धाड : येथून १४ किमी अंतरावर असलेल्या ग्राम देवपूर येथे दोन ठिकाणी घरफोडीची घटना घडली. यामध्ये दोन लाख ९५ ...

धाड : येथून १४ किमी अंतरावर असलेल्या ग्राम देवपूर येथे दोन ठिकाणी घरफोडीची घटना घडली. यामध्ये दोन लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

देवपूर येथील रघुनाथ सखाराम नरोटे आणि अमोल भीमराव नरोटे यांचे गावापासून अंदाजे १ किमी अंतरावर शेतात घर आहे. ७ एप्रिल रोजी रात्री उपरोक्त शेतकरी कुटुंबासह घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत रघुनाथ नरोटे यांचे घरातील दोन तोळे सोन्याची पोत, एकदाणी, दोन ग्रॅम सोन्याची रिंग, नगदी ३० हजार रुपये व अमोल नरोटे यांच्या घरातून नगदी रोख एक लाख ३० हजार, दोन तोळे सोन्याची पोत, कानातील रिंग, चांदीचे २० तोळ्याचे कडे असा एकूण दोन लाख ९५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी सकाळी ५ वाजेदरम्यान या कुटुंबातील सदस्य उठले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात त्यांनी धाड पोलिसात तातडीने तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्यासह पीएसआय सागर पेंढारकर व कर्मचारी करीत आहेत.