युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 02:36 IST2017-03-17T02:36:25+5:302017-03-17T02:36:25+5:30

हिवरा आश्रम येथील घटना.

Teenage Suicide | युवकाची आत्महत्या

युवकाची आत्महत्या

हिवरा आश्रम(बुलडाणा), दि. १६- हॉटेलवर काम करणार्‍या युवकाने हॉटेलच्या पाठीमागे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास घडली.
येथील बसस्थानकाजवळील हॉटेलमध्ये कळंबेश्‍वर येथील नवलचंद मुकुंद शर्मा (वय २६) काम करीत होता. त्याने गळफास घेतल्याचे बुधवारी रात्री नागरिकांना निदर्शनास पडले. पोलिसांना कळविल्यानंतर ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संजय कर्‍हाडे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Teenage Suicide