शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

२00 रूपयांची लाच घेताना तलाठी अटकेत

By admin | Updated: May 30, 2015 02:27 IST

वैरागड येथे लाचलुचपत विभागाची कारवाई.

चिखली (जि. बुलडाणा): सातबार्‍यावर पीककर्जाचा बोजा चढविण्यासाठी शेतकर्‍याकडून २00 रुपयांची लाच स्वीकारताना तालुक्यातील वैरागड येथे कार्यरत तलाठी शिवानंद वाघ यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई २९ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास करण्यात आली. तालुक्यातील हारणी येथील अरूण पवार यांचे वडिलांच्या नावावरील गट क्रमांक ५/१ मधील शेतावर वाढीव पीककर्ज मंजूर झाल्याने बँकेने पूर्वीचे पीक कर्जाचा बोजा सातबारावर चढवून आणण्यास सांगितले. त्यानुसार वैरागड-हारणी वर्ग ३ चे तलाठी शिवानंद नंदराम वाघ वय ४0 यांच्याकडे शेतकरी गेला असता तलाठी वाघ यांनी पाचशे रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती दोनशे रुपये घेऊन येण्यास सांगितले. याबाबत शेतकरी पवार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर २९ मे सापळा रचण्यात आला होता. दरम्यान, दुपारी पावणे बाराच्या सुमारास वैरागड येथील तलाठी कार्यालयात तलाठी शिवानंद वाघ हे शेतकरी अरूण पवार यांच्याकडून २00 रुपये स्वीकारताना बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळय़ात अडकले. याप्रकरणी कलम ७, १३ (१) (ड) सह १३ (२) लालुप्रकानुसार तलाठी शिवानंद वाघ विरुद्ध अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश चिमटे, अपर पोलीस अधीक्षक आर.एस.तडवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक एस.एल.मुंढे, पोनि. नाईक, पोहेकाँ सुभाष शेकोकार, नेवरे, पोना शेवाळे, जवंजाळ, ठाकरे, नीलेश सोळंके, राजनकर, वारूळे यांचा सहभाग होता. मागील वर्षभरात लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत वाढली आहे. लोकांमध्ये जागृती होत असल्याने अशा प्रकरणाचा पडदाफाश होत आहे.