कृषी सहायकांचे विविध मागण्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:56+5:302021-07-07T04:42:56+5:30

सध्याच्या कोरोना निर्बंधाच्या परिस्थितीतही जिल्ह्यातील कृषी सहायकांमार्फत निरंतर विविध योजनांची कामे केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत काम करीत असताना ...

Statement of various demands of agricultural assistants | कृषी सहायकांचे विविध मागण्यांचे निवेदन

कृषी सहायकांचे विविध मागण्यांचे निवेदन

सध्याच्या कोरोना निर्बंधाच्या परिस्थितीतही जिल्ह्यातील कृषी सहायकांमार्फत निरंतर विविध योजनांची कामे केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत काम करीत असताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे. यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलडाणा यांना विनंती करण्यात आली होती. परंतु सदर निवेदनाचा कुठलाही विचार न करता संपूर्ण जिल्हाभर कृषी सहायकांवर आकस भावनेने कार्यवाही करण्यात येत असल्याचा आराेप निवेदनात करण्यात आला आहे़ उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव यांच्या कारवाईस कंटाळून कृषी सहायकांनी बेमुदत उपाेषणाचा इशारा दिला आहे़

अशा आहेत मागण्या

जिल्ह्यातील कृषी सहायकांवर प्रस्तावित सर्व कार्यवाही मागे घ्यावी, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील विविध अडचणींबाबत, क्रॉपसॅप अंतर्गत प्रलंबित अनुदान द्यावे, कोरोना परिस्थितीचे गांभीर्य बघता कृषी सहायक यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करावे, वाढत्या विविध योजना व त्यांचे नवनवीन ॲप्स यांचा वाढता वापर पाहता कृषी सहायक यांना त्वरित टॅब/लॅपटॉप/मोबाईल पुरवावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़

असे आहेत आंदाेलनाचे टप्पे

६ व ७ जुलै राेजी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार आहे़ ८ जुलै राेजी जिल्ह्यातील सर्व कृषी सहायक यांच्याकडील अतिरिक्त पदभार साेडणे, विविध कार्यालयीन व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडणे, ९ जुलै रोजीपासून सर्व ऑनलाईन ॲप्स वापरावर बहिष्कार टाकणे, १२ जुलैपासून संपूर्ण लेखणीबंद करणे़ तरीही मागण्या मान्य न झाल्यास आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे़

Web Title: Statement of various demands of agricultural assistants