शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तुरीला मिळणार ४७00 प्रतिक्विंटल भाव !

By admin | Updated: December 11, 2014 00:07 IST

केंद्रीय कृषीमाल पणन केंद्राचा अंदाज.

अकोला : तूरीला राज्यात प्रतिक्विंटल ४६00 ते ४७00 रू पये भाव मिळण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाच्या कृषीमाल विपणन केंद्राने वर्तविली आहे. भारतात तूर या कडधान्य पिकाचे सर्वाधिक क्षेत्र हे या राज्यात असून, गतवर्षी ९३.२0 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती; तथापि यावर्षी पावसाला विलंब झाल्याने तुरीचे क्षेत्र घटून, ते ८३.२४ लाख हेक्टरपर्यत खाली आले आहे. तूर पीक कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते. यावर्षी या पिकाचे उत्पादन २.७४ लाख टन अपेक्षित आहे. या राज्यातील तूर कडधान्यातील प्रमुख पीक असल्याने, जळगाव, लातूर, औरंगाबाद, मुंबई, अकोला, नागपूर आदी जिल्हे तूर खरेदी विक्रीचे प्रमुख व्यापार केंद्र आहेत. यावर्षी उत्पादन कमी होण्याचे संकेत असल्याने शेतकर्‍यांना तुरीच्या भविष्यातील किंमतीची प्रतिक्षा आहे. याच पृष्ठभूमीवर या कृषी विद्यापीठातील एनकॅप (एनसीएपी) नवी दिल्ली, कृषी विपणन केंद्राचे कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र देशमुख, सहाय्यक प्रकल्प प्रमुख डॉ. वनिता खोबरकर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक गजानन नागे, विजय बोदडे यांनी लातूर बाजारातील मागील १४ वर्षाच्या कालावधीतील मासीक सरासरी किंमतीचे पृथक्करण केले. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार बाजारपेठेतील चालू किं मती कायम राहिल्यास डीसेंबर महिन्यात तुरीची सरासरी किंमत प्रतिक्विंटल ४६00 ते ४७00 रू पये राहण्याची शक्यता आहे. आयात निर्यात धोरणात आणि हवामानात काही बदल झाल्यास त्याचा तुरीच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता या शेतमाल विपणन केंद्राने व्यक्त केली आहे. यावर्षी चालू महिन्यात तुरीचे प्रतिक्विंटल दर ४६00 ते ४७00 रू पये राहण्याची शक्यता आहे. आयात निर्यात धोरण आणि हवामानात काही बदल झाल्यास या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विक्री व साठवणुकीसाठी शेतकर्‍यांना ही माहिती दिली असल्याचे पंदेकृविच्या कृषी विपणण प्रकल्पाचे प्रमुख डॉ.राजेंद्र देशमुख यांनी सांगीतले.