शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण

By admin | Updated: September 22, 2014 00:46 IST

१९ वर्षाआतील मुलींच्या स्पर्धेत प्रथम पुणे विभाग, द्वितीय मुंबई विभाग.

बुलडाणा : खेळावर निष्ठा ठेवून सातत्याने खेळाचा सराव केल्यास तुम्हाला यश निश्‍चित मिळेल. अपयशाने खचून न जाता यशासाठी प्रयत्न करणे, ध्येय निश्‍चीत करुन सातत्याने त्याचा पाठलाग केला तर तुम्ही यशस्वी खेळाडू व्हाल, असे विचार अप्पर पोलिस अधिक्षक श्‍वेता खेडकर यांनी व्यक्त केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेच्या घेण्यात आल्या. त्यांनतर २0 सप्टेंबर रेाजी झालेल्या बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, निवड समिती सदस्य संजय कडू, जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे जयसिंग जयवार, राज्य क्रीडा परिषद सदस्य राजेश महाजन, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांची उपस्थित होती. या क्रीडा स्पर्धेत १४ वर्षाआतील स्पर्धेत प्रथम क्रमांक मुंबई विभाग, द्वितीय पुणे विभाग, तृतीयक्रीडा प्रबोधिनी, बुलडाणा तर १७ वर्षाआतीत मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मुंबई विभाग, द्वितीय क्रीडा प्रबोधिनी, बुलडाणा आणि तृतीय कोल्हापूर तर १९ वर्षाआतील मुलींच्या स्पर्धेत प्रथम पुणे विभाग, द्वितीय मुंबई विभाग, तृतीय क्रमांक नागपूर विभाग यांनी मिळविला. सर्व विजयी संघाना मान्यवरांच्या हस्ते विजय चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या प्रसंगी आंध्रप्रदेश येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्याच्या १४,१७,१९ वर्ष मुलींच्या संघाची घोषणा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केली. महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.