शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंचच्या आदेशाला स्टेट बँकेकडून केराची टोपली

By admin | Updated: May 22, 2014 23:40 IST

ग्राहक मंचाकडून बँकेच्या व्यवस्थापकाविरुध्द निकाल देऊन दोन महिन्याचा कालावधी होऊनही तक्रारकर्त्याचे खात्यात सदर धनादेशाची रक्कम जमा करण्यात आली नाही.

संग्रामपूर : खात्यामध्ये धनादेश जमा झाला असतांना रक्कम जमा दिसत नसल्याची तक्रार करुनही येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने दखल घेतली नाही. याबाबत ग्राहक मंचाकडून बँकेच्या व्यवस्थापकाविरुध्द निकाल देऊन दोन महिन्याचा कालावधी होऊनही तक्रारकर्त्याचे खात्यात सदर धनादेशाची रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहक मंचाचे आदेशाला बँकेने केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे. वरवट बकाल येथील प्रा. सुभाष गुर्जर हे सप्टेंबर २0१२ मध्ये अमृतसर युनिर्व्हसीटी मध्ये रिप्रेशर कोर्स ट्रेनिंगसाठी २४ दिवसांकरिता गेले होते. तेथे राहण्याचा, खाण्याचा खर्चाच्या मोबदल्यात त्यांना ८00४ (आठ हजार चार) रुपये रकमेचा धनादेश क्र. 0४७५४९ देण्यात आला होता. हा धनादेश प्रा.सुभाष गुर्जर यांनी संग्रामपूर स्टेट बँक शाखेत जमा करणेसाठी दिला होता. तशी त्यांच्या पासबुकातही धनादेश जमा झाल्याची नोंद करण्यात आली मात्र त्या धनादेशाची रक्कम खात्यामध्ये जमा झाली नाही. त्यामुळे प्रा.सुभाष गुर्जर यांनी वेळोवेळी बँकेत जावून चौकशी केली तसेच बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनाही विचारणा केली. मात्र प्रा.सुभाष गुर्जर यांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. बँकेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मुंबई, सहाय्यक महाप्रबंधक क्षेत्र बुलडाणा यांचेकडे तक्रार केल्यावरही आठ महिन्याच्या काळात सदर रक्कम खात्यात जमा झाली नाही. अखेर प्रा.गुर्जर यांनी हे प्रकरण ग्राहक मंचात सादर केले. त्यांनी सादर केलेले पुरावे व कागदपत्रे यावरुन ही तक्रार खरी असल्याचे दिसून आले. ग्राहक मंचाच्या समितीकडून सर्व पडताळणी करण्यात आल्यावर याबाबतचा आदेश काढण्यात आला. त्यामध्ये बँकेच्या व्यवस्थापकाने 0४७५४९ क्रमांकाच्या धनादेशाची रक्कम ८00४ रुपये तक्रारकर्त्याला द्यावेत किंवा खात्यात जमा करावे. या रकमेवर बँकेचे व्याज देण्यात यावे, शारिरीक, मानसिक त्रासापोटी तक्रारकर्त्याला तीन हजार रुपये द्यावे, न्यायालय खर्चापोटी तक्रारकर्त्याला दोन हजार रुपये द्यावे. या आदेशाचे पालन आदेश पारीत केल्यानंतर ४५ दिवसाचे आत करावे, असेही यामध्ये सूचित करण्यात आले होते. हा आदेश १५ फेब्रुवारी २0१४ मध्ये पारीत केला होता. मात्र या आदेशाची मुदत १ एप्रिल रोजीच संपली तरीही बँकेच्या व्यवस्थापकाकडून या आदेशाचे पालन झाले नसल्याचे समजते व अद्याप तक्रारकर्त्याचे खात्यात सदर धनादेशाची रक्कम जमा करण्यात आली नाही, अशी माहिती प्रा.सुभाष गुर्जर यांनी दिली.