शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १४ हजार हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: July 22, 2014 23:49 IST

तालुक्यात ४५ मि.मी. पावसाची नोंद असून गत पाच वर्षातील हा निच्चांक आहे. झालेल्या पावसामुळे आतापर्यंत केवळ १४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या केल्या आहेत.

खामगाव : यावर्षीच्या खरीप हंगामास दीड महिना उलटूनही दमदार पाऊस बरसलाच नाही. आज २२ जुलैपर्यंत तालुक्यात ४५ मि.मी. पावसाची नोंद असून गत पाच वर्षातील हा निच्चांक आहे. झालेल्या पावसामुळे आतापर्यंत केवळ १४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या केल्या आहेत. तर गतवर्षी १00 टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. खामगाव तालुक्याचे शहरासह १ लाख २0 हजार २२४ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून यामधील ८४ हजार २४४ हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे. तालुक्यात १४५ गावात ५४ हजार ६६२ खातेदार संख्या आहे. पेरणीसाठी उपलब्ध असलेल्या क्षेत्रापैकी हलक्या प्रतीची ४0 हजार ४१६ हेक्टर, मध्यम ३0 हजार ३७१ तर उच्च प्रतीची १३ हजार ४५७ हेक्टर जमीन आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात दरवर्षीप्रमाणे पेरण्यास सुरूवात होईल या आशेने शेतकर्‍यांनी केलेली तयारी पावसाअभावी ठप्प पडली. मृग व आद्रा नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी पार खचला आहे. पेरणीचा दीड महिना उलटूनही दमदार पाऊस नसल्याने शेतकरी पेरणीस धजावला नाही. आतापर्यंत तालुक्यात केवळ ४५.0४ पावसाची नोंद आहे. ज्या शेतकर्‍यांकडे सिंचनाची सुविधा आहे. अशा शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र विहिरीची पाणीपातळी खालावल्याने ते सुध्दा चिंताग्रस्त आहेत. गतवर्षी १00 टक्के पेरण्या यावेळपर्यंत आटोपल्या होत्या. परंतु पुरेशा पावसाअभावी यंदा केवळ १४ हजार १0४ हेक्टर क्षेत्रावर कपाशी, सोयाबीन, उडीद, मुग, तूर, ज्वारी तसेच इतर पिकांचा पेरा झाला आहे. अद्यापही दमदार पावसाची शेतकर्‍यांना प्रतीक्षा असून खरीप हंगामाचे नियोजन मात्र कोलमडले आहे.