शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सागवान वृक्षाला तस्करीची कीड

By admin | Updated: April 17, 2017 00:53 IST

बुलडाणा- सागवन वृक्षाला लाकूड तस्करीची कीड लागली असून, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एका वर्षात विदर्भातील पाच वनक्षेत्रात ७,२०२ सागवृक्षांची कत्तल केल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे

विदर्भात अवैध वृक्षतोड वाढली : वर्षभरात ७ हजार साग वृक्षांची कत्तल

बुलडाणा: वनराईवर अवैध वृक्षतोड करणाऱ्यांची वक्रदृष्टी पडली आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोड वाढली. यात मौल्यवान समजल्या जाणाऱ्या सागवन वृक्षाला लाकूड तस्करीची कीड लागली असून, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एका वर्षात विदर्भातील पाच वनक्षेत्रात ७,२०२ सागवृक्षांची कत्तल केल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे. सागवान लाकडाला सोन्याचा भाव आल्याने जंगलातील या झाडांची कत्तल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कधी रात्रीच्या वेळी तर कधी दिवसाढवळ्या राजरोसपणे ही वृक्षतोड केली जात आहे. पण या अवैध वृक्षतोडीकडे सोईस्कर की अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शहर आणि परिसरात सॉ मिलवर व फर्निचर दुकानात काळ्या बाजारातील लाकडाची खरेदी केली जाते.वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी वन अधिकारी, वनरक्षकासह आदी कर्मचारी वनक्षेत्राची नियमित गस्त, आरागिरण्यांची तपासणी आणि तपासणी नाक्याद्वारे वाहनांची तपासणी इत्यादी करीत असतात. तरीदेखील एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एक वर्षाच्या काळात विविध प्रजातीच्या ३० हजार ३६२ वृक्षांची अवैधरीत्या कत्तल करण्यात आली. यात ७२०२ सागवृक्षांचा समावेश आहे.राज्यात वृक्षतोड वाढली!गत तीन वर्षाच्या काळात विविध वनपरिक्षेत्रामध्ये वृक्षांची अवैध वृक्षतोड झाल्याच्या घटना वाढल्या आहे. २०१४-१५ मध्ये १ लाख १९ हजार ८६७ वृक्षांची अवैधरीत्या तोड करण्यात आली. तर २०१५-१६ मध्ये हा आकडा १ लाख २६ हजार १३७ वर पोहचला.तर २०१६-१७ यात भर पडून तब्बल १ लाख ३९ हजार ५८६ वृक्षांची अवैधरीत्या तोड करण्यात आली. यात १ लाख ७५ हजार ३३९ सागवृक्ष आहे.८२ हल्ले आणि २५९ जखमीवृक्षतोडीला आळा घालण्यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या वनाधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाकूड तस्करांकडून २०१४ ते २०१७ या वर्षादरम्यान ८२ हल्ले करण्यात आले. यात २५९ वनकर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी वन विभागाच्या तक्रारीवरून वनगुन्हे दाखल करण्यात आले आहे.