शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

निवारा योजना रखडली

By admin | Updated: June 21, 2014 00:01 IST

शासनाची उदासीनता: घरकुलाचे स्वप्न ठरतेय मृगजळ

नाना हिवराळे / खामगाव
ग्रामीण भागातील कुटूंबासाठी निवारा म्हणून शासन विविध योजना राबवून त्यांना हक्काचे घर देत आहे. दारिद्र रेषेखालील कुटूंबाबरोबरच दारिद्र रेषेवरील कुटूंबांनाही घरकुलाचा लाभ मिळावा करिता शासनाने बँकेच्या सहकार्याने कर्ज स्वरुपात परंतु बिनव्याजी कर्ज देवून राजीव गांधी निवारा योजना-२ सुरु केली होती. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या उदासिन धोरणामुळे तसेच बँकेच्या असहकार्याने या योजनेतील घरकुलाचे स्वप्न मृगजळ ठरले आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटूंबासाठी घरकूल उपलब्ध करुन देण्यासाठी शासन विविध योजना राबवून घरकूल देत आहे. इंदिरा आवास योजना, पंतप्रधान ग्रामोदय योजना, रमाई घरकूल योजना या योजनामार्फत्र हजारो कुटूंबांना स्वताचे घर मिळाले आहे. रहायला स्वताची जागा असो अथवा नसो अशाही कुटूंबाचे शासकीय जागेवर घरकुल उभे आहे. परंतु अल्प उत्पादनामुळे स्वताचे पक्के घर बांधता येत नाही, जे दारिद्र्य रेषेखालील आहेत अशा अनेक कुटूंबाना या योजनाचा लाभ घेता येत नाही. त्याकरिता महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट २00८ मध्ये सुधारीत राजीव गांधी निवारा योजना-२ सुरु केली. या योजनेत बीपीएल अंत्योदयची अट नसल्यामुळे या योजनेचा लाभ सर्व सामान्य जनतेला देण्यात येत होता.
शासनाने योजनाचा लाभ देण्यासाठी बँकाचे सहकार्य घेतले होते. लाभार्थ्यांला बँकेकडून १ लाख रुपये कर्जाऊ स्वरुपात देवून त्याची टप्प्याटप्प्याने परतफेड करायची होती. या कर्जाचे व्याज मात्र लाभार्थ्यांना माफ होते. खामगाव पंचायत समिती अंतर्गत सन २0१0-११ मध्ये २१९ लाभार्थी घरकुलाचे प्रस्ताव विविध बँकाकडे पाठविण्यात आले होते. यामधील १४४ घरकूल प्रस्ताव मंजुर करण्यात आले. तर ७५ घरकुलाचे नामंजुर केले. बँकेने परत पाठविलेल्या प्रस्तावात जमीनीचा अकृषक दाखला, सातबारावर जमीन अकृषक असल्याची नोंद, अकृषक प्रमाणपत्र, लाभार्थ्यांना सातबारावर एकापेक्षा अधिक लोकांची नावे, जागेचा नकाशा, चतरु:सिमा दर्शविणार्‍या दस्ताऐवजाचा अभाव, भुखंडाचे पट्टे, नसल्याचे प्रस्ताव नामंजुर करण्यात आले. परिणामी गरजू कुटूबांना या योजनेतील घरकुलापासून वंचीत रहोवे लागले. प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळेच सदर योजना पांढरा हत्ती ठरली आहे.