शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव पालिका ९0 कर्मचारी संपावर

By admin | Updated: July 22, 2014 23:43 IST

राज्यातील नगर पालिका कर्मचारी १५ जुलै पासून संपावर गेले आहेत. यामध्ये ८ दिवसानंतर शेगाव नगर पालीकेचे कर्मचारी सामील झाले

शेगाव : राज्यातील नगर पालिका कर्मचारी १५ जुलै पासून विविध न्याय मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. यामध्ये ८ दिवसानंतर आज मंगळवार पासुन शेगाव नगर पालीकेचे कर्मचारी या संपात सामील झाले असुन ९0 कर्मचार्‍यांनी संपात सहभाग घेतला. सेवानवृत्त कर्मचार्‍यांचे १00 टक्के वेतन शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे व्हावे. नगर पालिका कर्मचारी व सेवानवृत्त कर्मचार्‍यांची सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, नगर पालिकेतील अनुकंपाधारकास तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देण्यात यावी, नगर पालिका कर्मचार्‍यांना कालबध्द पदोन्नती तात्काळ लागू करावी, कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या कर्मचार्‍यांना व अपंग कर्मचार्‍यांना विशेष लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचारी संपावर गेले आहेत. यासह १९ मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्यातील न.प. कर्मचार्‍यांनी १५ जुलैपासुन काम बंद आंदोलन पुकारले होते. मात्र शेगाव नगर पालीकेतील अंतर्गत गटबाजीमुळे या न.प. मध्ये कर्मचारी संपावर गेले नव्हते. मात्र राज्यस्तरीय पदाधिकार्‍यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आज मंगळवारपासून येथील कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामध्ये १८१ पैकी न.प. मधील ९0 कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. कर्मचार्‍यांच्या या संपामुळे पालिकेतील अनेक विभाग सामसूम असल्याचे चित्र आज मंगळवारी दिसून आले. शिवाय प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. सामान्य प्रशासन, कर, शिक्षण , आस्थापना, विद्युत आदी विभागाचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे हे कार्यालय ओस पडले आहे.