शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शाकंबरी जिनिंगला आग

By admin | Updated: December 28, 2014 00:32 IST

मलकापूर तालुक्यातील घटना, ५0 लाखाचा कापुस जळूण खाक.

मलकापूर : तालुक्यात मौजे वाघुड शिवारात राष्ट्रीय महामार्ग ६ वरील शाकंबरी जिनिंग प्रेसिंगमध्ये अचानक भीषण आग लागून ४५ ते ५0 लाखांचा गंजीवरचा कापूस जळून खाक झाल्याची माहिती असून, ही घटना सायंकाळी ६.३५ वाजेच्या सुमारास घडली. या संदर्भात अधिक माहिती अशी की, मौजे वाघुड येथे कोल्हे पेट्रोल पंपानजीक शाकंबरी जिनिंग प्रेसिंग आहे. आज सायंकाळी ६.३५ वाजेच्या सुमारास तेथील कापसाच्या गंज्यांनी एकापाठी एक असा पेट घेतला. पाहता-पाहता अचानक लागलेल्या आगीने मोठय़ा प्रमाणात उग्र रूप धारण केले. यासंदर्भात जिनिंग प्रेसिंगचे संचालक संतोष अग्रवाल यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आजवर या हंगामात खरेदी केलेला कापूस त्याच शेडमध्ये होता. त्याच्या गंज्या होत्या. अचानक आग लागल्याने आमच्यासह कर्मचारी व कामगारही हैराण झाले. घटना घडल्यानंतर माहिती कळताच नगरपरिषदेचे दोन, बाजार समिती व वीरचंद नरशी ग्रुपचे प्रत्येकी एक असे तीन अग्निशामक घटनास्थळी दाखल झाले. त्यांची आग शमविण्यात मदत झाली. सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास आग शमली; मात्र तोवर ४५ ते ५0 लाखांचा कापूस जळून खाक झाल्याचा अंदाज प्राप्त माहितीवरून वर्तविण्यात येत असून, शाकंबरी जिनिंगला लागलेली काळातील ही दुसरी आग आहे.