शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा येथे दरोडेखोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: November 8, 2014 23:41 IST

एकाच रात्री फोडली चार दुकाने.

सिंदखेडराजा (बुलडाणा): शहरातील चार दुकाने एकाच रात्री फोडून काही ऐवज लंपास केल्याची घटना ८ नोव्हेंबरच्या पुर्वरात्री २.३0 ते ४ वाजेदरम्यान घडली. शहरात दरोडेखोरांच्या धुमाकूळामुळे शहरावासीयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात माहिती अशी की, शहरातील पोस्ट ऑफिस चौकातील मुख्य मार्केटमध्ये हरीचंद्र शिवलाल चौधरी यांचे बारचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतू, दुकानातील फर्णीचर तोडता न आल्याने चोरटे दुकानात प्रवेश करु शकले नाहीत. याच दुकानाच्या समोर अंबादास डुकरे यांच्या जागेमध्ये भाडेतत्वावर गोविंद मच्छींद्रनाथ किंगरे यांचे जनरल स्टोअर होते. त्या दुकानचे शटर तोडण्याचा चोरटे प्रयत्न करीत असतांना शेजारी असलेले नागरीक जागे झाले. दरम्यान चोरट्यांनी चौकीदार शे. बुर्‍हाण शे. अमीर याच्या गळ्याला चाकु लावुन घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर स्थानिक बँक ऑफ महाराष्ट्र शाखे समोरील औषधीच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकान उघडले. परंतू, चोरट्यांना तेथेही नगदी रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चोरट्यांनी औषधीच्या दुकानातून मोर्चा टी पॉईंट जवळील राजेंद्र आढाव यांच्या गॅस एजंन्सीकडे वळविला. गॅस एजंन्सीच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. मात्र, तेथे सी.सी.टिव्ही कॅमेरे दिसून आल्याने चोरट्यांनी सी.सी.टिव्हीचा डाटा बॉक्स किंमत १२ हजार ५00 रुपये व मॉडेम, असा ३ हजार ५00 रुपयाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी चारही दुकानदारांनी सिंदखेडराजा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक बी.डी. मसराम, उपनिरिक्षक चित्तरवार व जाधव यांनी घटनास्थळीजाऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.