शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ११७ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:11 IST

Medical officers salary ११७ वैद्यकीय अधिकाऱ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्यांचे वेतनच मिळाले नसल्याचे चित्र आहे़. 

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात गत काही महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ काेराेनाच्या काळात जीव धाेक्यात घालून सेवा देणाऱ्या प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतनासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे़.  जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आराेग्य केंद्रात नियुक्त असलेल्या ११७ वैद्यकीय अधिकाऱ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्यांचे वेतनच मिळाले नसल्याचे चित्र आहे़.  तसेच ५६ तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना फेब्रुवारीपासून नियुक्तीच दिली नसल्याचे चित्र आहे़.  जिल्ह्यात गत काही महिन्यात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ शहरांसह ग्रामीण भागातही काेराेना रुग्णांची संख्या वाढली आहे़  ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आराेग्य केंद्रावर माेठ्या प्रमाणात ताण वाढला आहे़. वाढलेल्या ताणात आपला जीव धाेक्यात घालून सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मात्र वेतनासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे़.  जानेवारी महिन्यांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन रखडले हाेते़. १६ एप्रिल राेजी महाराष्ट्र राज्यपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने आंदाेलनाचा इशारा दिल्यानंतर एका महिन्याचे वेतन वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहे़. तसेच फेब्रुवारी व मार्च महिन्यांचे वेतनच मिळाले नसल्याचे चित्र आहे़.  जिल्हा प्रशासन प्रशासनाच्या ढिसाळ नियाेजनामुळे काेराेना याेद्धा असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतनापासून वंचित राहावे लागत आहे़  काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना जानेवारी महिन्याचेही वेतन मिळाले नसल्याचे चित्र आहे़.

  प्राथमिक आराेग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन येत्या दाेन दिवसात जमा करण्यात येणार आहे़. तसेच ज्या तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती राहिल्या आहेत, त्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़.        

        - डाॅ. राजेंद्र सांगळे, प्रभारी जिल्हा आराेग्य अधिकारी, बुलडाणा

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले हाेते़ संघटनेने वारंवार पाठपुरावा केल्याने जानेवारी महिन्याचे वेतन मिळाले आहे़. तसेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन रखडलेले आहे़. संघटनेने आंदाेलनाचा इशारा दिल्यानंतर एक महिन्याचे वेतन देण्यात आले़ तसेच तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीसाठी पाठपुरावा सुरू आहे़. - डाॅ़ नीलेश टापरे, अध्यक्ष महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना बुलडाणा जिल्हा 

टॅग्स :buldhanaबुलडाणाdoctorडॉक्टर