शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

रमाई आवास योजनेबाबत उदासिनता

By admin | Updated: August 21, 2014 00:14 IST

जाचक अटी : सहा महिन्यांच्या कालावधीत केवळ १५0 लाभार्थींचे प्रस्ताव

इसोली : शासनाचे ध्येय धोरणानुसार अनुसुचित जाती व नवबौध्द कुटुंबांना हक्काचे घर मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने रमाई आवास योजना सुरु केली. परंतु चिखली तालुक्यातील लाभार्थी आपले प्रस्ताव दाखल करणेसाठी उदासीन असून पं.स. स्तरावर ८४८ रमाई आवासचे उद्दिष्टपूर्ण करावयाचे होते. परंतु सदर ८४८ प्रस्तावपैकी केवळ तालुक्यातून १५0 लाभार्थिनीच प्रस्ताव सादर केल्यामुळे सदर योजनेप्रति लाभार्थीमध्ये शासनाच्या जाचक असलेल्या अटीमुळे उदासीनता असल्याचे दिसून येते.अनुसूचित जाती व नवबौध्द कुटुंबांना स्वत:चे हक्काचा निवारा मिळावा म्हणून शासनाने रमाई आवास योजना कार्यान्वित केली. सदर योजनेसाठी चिखली तालुक्याला ८४८ रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट होते. सदर उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना गटविकास अधिकारी यांनी आदेशित केले होते. त्यानुसार ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेवून सदर लाभार्थिंची निवड शासन परिपत्रकानुसार केली. परंतु ग्रामीण भागातील लाभार्थी मात्र सदर योजनेच्या नियम व अटीनुसार सदर अतिक्रमण जागेवर लाभार्थी राहात असल्यास लाभ देत येत नाही तर जातीचे प्रमाणपत्र काही लाभार्थींकडे नसल्यामुळे सदर योजनेप्रती उदासिनता असल्याचे बोलले जात आहे.सन २0११ मध्ये अल्पसंख्यबहुल घरकुलासाठी तर इंदिरा आवास योजनेसाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना अतिक्रमण धारकांना ५00 वर्ग पर्यंत जागा देण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या रमाई आवाससाठी जागा उपलब्ध करुन सदर योजनेचा लाभ देण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच तहसीलदार यांचे सहिनिशी झालेले जातीचे प्रमाणपत्र रद्द केल्याने काही लाभार्थ्यांना अपात्र ठरविले आहे.त्यामुळे सदर जातीच्या दाखल्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थींना ग्राह्य धरण्यात येवून एकाच परिवारातील वडीलाचे नावे तर जागा मुलांचे नावे तर भाऊ व आईच्या नावाने आहे. त्यामुळे या शासनाच्या अटी व शर्ती पूर्ण करु शकत नाही त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे प्रतिज्ञालेख किंवा राशन कार्ड ग्राह्य धरुन सदर लाभार्थींना लाभ देण्यात यावा, अशीही मागणी होत आहे.सदर अटी लाभार्थी पूर्ण करु शकत नसल्याने तालुक्यातील शासनाकडून ८४८ रमाई उद्दीष्ट असताना फक्त १५0 लाभार्थींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पंचायत समितीला दिलेले उद्दिष्ठ पूर्ण झाले नसल्याचे दिसून येत आहे.