शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

दगडवाडी ग्रामस्थांचा बैलगाडी मोर्चा

By admin | Updated: August 28, 2015 00:20 IST

शेतरस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे आंदोलन.

देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील ग्राम दगडवाडी येथे ४५, ३६, ३२, ४0 क्रमांकाच्या गटातला रस्ता अडविण्यात आला आहे. तो रस्ता त्वरित मोकळा करून देण्यात यावा, या मागणीसाठी दगडवाडी ग्रामस्थांनी २७ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. येथील पूर्वीचा शेतरस्ता ग्राम दगडवाडी येथील काही लोकांनी बळजबरीने अडविला आहे. त्यामुळे सदर गटक्रमांकातील शेतकर्‍यांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. यामुळे शेतकर्‍यांच्या बैलगाडी शेतापर्यंत नेता येत नाही. त्यातच रस्त्यात मध्ये असलेल्या नदीला पूर आल्यानंतर पाणी ओसरेपर्यंत वाट पहावी लागते. काही दिवसांपूर्वी नदीमधून रस्ता ओलांडताना एक महिला शेतकरी पुरामध्ये वाहून गेल्याची घटना घडली हो ती. सदरचा रस्ता त्वरित मोकळा करून देण्यासाठी १६ जुलै रोजी एसडीओ कार्यालय सिंदखेडराजा यांच्याकडे तक्रार करून न्याय मागितला होता तसेच न्याय न मिळाल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारासुद्धा देण्यात आला होता. शासनाने दखल न घेतल्याने अखेर दगडवाडी ग्रामस्थांनी देऊळगावराजा तहसीलसमोर बैलगाडी मोर्चा काढून उपोषणास प्रारंभ केला आहे.