शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

टीईटीमुळे शासनाला मिळाला १७ कोटी ६५ लाखाचा महसूल !

By admin | Updated: December 22, 2014 23:43 IST

राज्यभरातून ४ लाख १४ हजार भावी शिक्षकांनी दिली शिक्षक पात्रता परीक्षा.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर : गतवर्षीपासून राज्य शासनाने भावी शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. यावर्षी राज्यभरातून ४ लाख १४ हजार ८१५ भावी शिक्षकांनी ही परीक्षा दिली. यामुळे शासनाला सुमारे १७ कोटी ६५ लाख ६७ हजारच्या जवळपास महसूल मिळाला आहे.भावी शिक्षकांसाठी शासनाने सीईटी ही सामाईक प्रवेश परीक्षा लागू केली. सन २0१0 मध्ये शिक्षकांच्या १५ हजार १२ जागांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील शाळांमध्ये गुणात्मक व दज्रेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने भावी शिक्षकांची पुन्हा चाळणी करण्यास सुरूवात केली. त्यासाठी टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा सन २0१३ पासून सुरु करण्यात आली. गतवर्षी सुमारे ६ लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा दिली होती. यावर्षी १४ डिसेंबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये राज्यातून ४ लाख १४ हजार ८१५ भावी शिक्षकांनी ही परीक्षा दिली. टीईटीच्या नावाखाली राज्यभरातून ४ लाख १४ हजार ८१५ भावी शिक्षकांकडून तब्बल १७ कोटी ६५ लाख ६७ हजार ७00 रुपये शासनाने जमा केले आहेत. राज्यभरातून पहिली ते पाचवी गटासाठी असलेला प्रथम पेपर २ लाख ६0 हजार ६१६ विद्यार्थ्यांनी दिला. त्यामध्ये जवळपास १३ कोटी ३ लाख ८ हजार रुपये शासनाकडे जमा झाले. सहावी ते आठवी या गटातील द्वितीय पेपर देणार्‍या १ लाख ५४ हजार १९९ विद्यार्थ्यांकडून ४ कोटी ६२ लाख ५९ हजार ७00 रुपये जमा झाले आहेत. भावी शिक्षकांकरीता शासन वेळोवेळी परीक्षा काढत असून शिक्षक भर्ती करण्याचे कुठलेच संकेत मात्र देत नाही. त्यामुळे तिव्र असंतोष व्यक्त होत आहे.