शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा फटका; हातातोंडाशी आलेला घास हिरावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 13:44 IST

परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावत चालला आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन, ज्वारीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन व ज्वारीला तर हिरवेकच्च कोंब आलेले आहेत. परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावत चालला आहे.जिल्ह्यात सात लाख २९ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. यावर्षी सुरूवातीला पावसाचे चिन्ह चांगले असल्याने कृषी विभागाच्या नियोजनानूसार जिल्ह्यात १०३ टक्के पेरा झाला. गेल्या १५ दिवसांपासून सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. परंतू परतीच्या पावसाने सोयाबीन काढणीला मोठा खोडा निर्माण केला आहे. ज्या ठिकाणी सोयाबीन सोंगणी झाली, त्यांनी शेतातच सुडी लावलेली आहे. परंतू या पावसामुळे सोयाबीन सुडीलाच फटका बसत आहे. सुडी लावलेल्या सोयाबीनला कोंब आल्याने त्याचे नुकसान होत आहे. तर शेतात उभ्या असलेल्या ज्वारी पिकासाठी सुद्धा हा पाऊस नुकसानकारक ठरत आहे. ज्वारीच्या कणसाला कोंब येत असल्याचे दिसून येत आहे. परतीच्या पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.कपाशीचे बोंडही झाले खराबजिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९९ हजार २७३ हेक्टर आहे. त्यापैकी २ लाख १३ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरा झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात नियोजित क्षेत्रापैकी १०७ टक्के कापूस लागवड आहे. परंतू परतीच्या पावसाने हे कापूस पीक धोक्यात सापडले आहे. सोयाबीन पाठोपाठ कपाशी पीक घेतले जाते. जिल्ह्यात कपाशी उत्पादक शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतू अतिपावसाने कापासाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शेतात असलेली कापासाची बोंडे खराब झालेली दिसून येत आहेत.

‘शेतकºयांना तातडीने मदत द्या’परतीच्या पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, ज्वारी, कपाशी उत्पादक शेतकरी संकटात आहे. काही शेतकºयांना शेतात लागलेली सोयाबीन सुडी काढूण आणणे अवघड झाले आहे. अनेकांच्या शेतात पाणी साचलेले असल्याने सोयाबीन सोंगता येत नाही. नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.

- नामदेवराव जाधव, शेतकरी नेते, शेतकरी संघटना.

नुकसानग्रस्त भागाचा सर्वे सुरू आहेज्या शेतकºयांची सोयाबीन अद्याप शेतात आहे, त्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. सोयाबीन व ज्वारी पिकाला मोड आलेले आहेत. कापूस पिकाचे काहीच ठिकाणी नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाज घेणे पूर्ण झाले असून, आता नुकसानग्रस्त भागात सर्वे करण्यात येत आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर सर्वेला वेग येईल.

- नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी