शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीवर होणारा परिणाम

By admin | Updated: May 17, 2014 23:32 IST

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने आघाडी घेतली, याचा आगामी निवडणुकीवरही परिणाम होऊ शकतो.

बुलडाणा: बुलडाणा लोकसभा मतदारसंघात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने आघाडी घेतली, याचा आगामी निवडणुकीवरही परिणाम होऊ शकतो. या निकालाचे सर्वजण विेषण करीत असून, कुणाचा फायदा कुणाचा तोटा होऊ शकतो, याचे मूल्यमापन सध्या केले जात आहे. प्रत्येक मतदार संघात समीकरणे वेगळी असतात. उमेदवारावर बरेच काही अवलंबून असतात; मात्र तरीही हा निकाल अनेकांना धडकी भरविणार ठरला आहे.

**फायदा की तोटा?

* बुलडाण्यात सेनेचे दोन गट आहेत; मात्र निकालामध्ये सेनेची एकसंघ ताकद दिसली. त्याला मोदी लाटेची जोड मिळाली. भविष्यात एकसंघ सेना व काँग्रेसचा उमेदवार कोण यावरच आ.शिंदे यांचे गणित राहील. खामगावात आ. सानंदा यांचा एकछत्री अंमल आहे, दोन्ही लोकसभा निवडणुकीत सेनेला आघाडी मिळाल्यावरही त्यांनी आपली ताकद कायम ठेवली, यावेळी मात्र त्यांना मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.

* चिखलीत भाजपामध्ये अर्धा डझन उमेदवार तयार आहेत. यांच्यामधील स्पर्धा वाढली तर आ. बोंद्रे यांना फायदाच होईल; मात्र एक उमेदवार ठरला तर संघाचे नेटवर्क व काँग्रेसची गटबाजी आ.बोंद्रे यांना अडचणीचे.

* सिंदखेडराजा हा राकॉंचा नव्हे तर आ.डॉ.शिंगणे यांचा गड आहे, यावेळी मात्र मतदारांनी त्यांचेही ऐकले नाही व सेनेला सर्वाधिक आघाडी दिली. दिल्लीत भाऊ व मुंबईत साहेब हेच सूत्र कायम राहिले तर आ.शिंगणे निश्‍चींत.

* मेहकर हा प्रतापगड आहे, गेल्यावेळी त्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र अपयशी ठरला. यावेळी तर भरभरून मतदान झाले, त्यामुळे विधानसभेत प्रतापराव हे डॉ.रायमुलकर यांच्यासाठी प्रतिष्ठा लावतील.

*जळगावमध्ये आ.डॉ.संजय कुटे यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यांनी मताधिक्य दिले आता विधानसभेत ते कुणाचा मामा करतात, हे प्रतिस्पर्धी उमेदवार कोण यावरच ठरेल सध्यातरी ते सेफ झोनमध्ये आहे.