शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

धाड पोलिसांचे धाडसत्र; गुटखा जप्त

By admin | Updated: June 1, 2017 00:10 IST

धाड : जामठी शिवारात ३२ हजारांची गावठी दारू नष्ट करून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर, ३० मेच्या रात्री म्हसला खुर्द येथील एका इसमाच्या घरातून सहा पोते गुटखा जप्त करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : जामठी शिवारात ३२ हजारांची गावठी दारू नष्ट करून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर, ३० मेच्या रात्री म्हसला खुर्द येथील एका इसमाच्या घरातून सहा पोते गुटखा जप्त करण्यात आला. तसेच मढमधून एका महिलेस देशी दारूची विक्री करताना अटक करण्यात आली. ठाणेदार संग्राम पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, त्यांनी आपल्या पथकासह जामठीपासून साधारण दोन कि.मी. जंगलात असणाऱ्या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा मारला असता त्याठिकाणी तब्बल ३२० लीटर हातभट्टीची दारू निर्माण करून, १६ डब्यात (पिपा) भरून होती. त्याठिकाणी पोलिसांनी पाहणी करून ती गावठी दारू पंचनामा करून जागेवरच नष्ट केली. ह्या प्रकरणी जामठीमधील आरोपी जुम्मन सुलेमान जाधव व युनुस लालू जाधव ह्या आरोपींवर मुप्रोका ६५(ड) नुसार कारवाई केली. ३१ मे रोजी म्हसला येथील आरोपी समाधान भगवान पांडे ह्या इसमाच्या घरी अवैधरीत्या गुटखा साठवला असल्याची गुप्त माहितीवरून ठाणेदार पाटील यांच्यासह पथकाने छापा मारून तब्बल सहा पोते गुटखा (३३० गुटखा पाकीट) जप्त केला. यावेळी अन्न व औषध विभागाचे अधिकारी गोपाल माहुरे उपस्थित होते. हा गुटखा ३९ हजार ६०० रुपायांचा असून, ह्या प्रकरणी पोलिसांनी गुटख्यासह आरोपी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात दिला आहे. तसेच मढमधील आरोपी शायराबाई अहमद बागुल ह्या महिलेकडून दारू जप्त केली आहे. कारवाईत एएसआय गजानन मुंडे, ना.पो.कॉ. प्रकाश दराडे, ऋषिकेश पालवे, माधव कुटे, प्रताप भुतेकर आदींनी सहभाग घेतला.