शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

रामपालांचा सत्संग अंगलट!

By admin | Updated: November 22, 2014 01:33 IST

खामगावातील तीन भाविकांपैकी एक जण अद्याप परतलेच नाही.

खामगाव (बुलडाणा): स्वयंभू आध्यात्मिक गुरू संत रामपाल महाराज यांच्या स त्संगाला जाणे, पहुरजीरा येथील भाविकांना चांगलेच महागात पडल्याची चर्चा आहे. सत्संगाला गेलेले काही भाविक शुक्रवारपर्यंत घरी पोहोचले आहेत. मात्र, यापैकी एक भाविक अद्यापही पोहोचला नसल्याने चिंतेचे वातावरण आहे.हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यातील बरवाला नगर येथे संत रामपाल महाराज यांचा सतपाल आश्रम आहे. या आश्रमात त्यांचे देश-विदेशातील भाविक सत्संगाला जातात. शेगाव तालुक्यातील पहुरजीरा येथे रामपाल महाराजांचे ३0-४0 भाविक आहेत. यापैकी बहुतांश भाविक आश्रमाच्या निमंत्रणावरून बरवाला येथील स तलोक आश्रमात सत्संगात गेले होते. त्यापैकी महादेव झांबरे आणि बद्री वाघोडे १४ नोव्हेंबर रोजी घरी परतले. तर श्याम पागृत, पुंजाजी पारस्कर हे गुरूवारी मध्यरात्री परत आले. मात्र, गावातील श्रीराम झाडोकार हे अद्यापपर्यंत पोहोचले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे गावात चिंता व्यक्त होत आहे. पंजाब उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून पोलिसांशी दोन हात करण्याचा प्रयत्न बाबा रामपाल यांनी आपल्या सर्मथकांच्या बळावर केला. अटक टाळण्याठी बाबा रामपालने आपल्या हजारो अनुयायांना सतपाल आश्रमात बोलाविले होते. यामध्ये शेगाव तालुक्यातील पहुरजीरा येथील भाविकांसह तब्बल दहा हजार भाविक आश्रमात पोहोचले. पोलिसांनी बाबा रामपाल यांना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिस आणि सर्मथक यांच्यामध्ये घुमश्‍चक्री झाल्याने तणाव वाढला. दरम्यान, पहुरजीरा येथील भाविकांना पोलिसांनी रेल्वे स्थानका पर्यंत आणून सोडले. या भाविकांसोबतच कुणाला बस स्थानक तर रेल्वे स् थानकापर्यंत आणण्यात आले. यावेळी प्रचंड तणाव निर्माण झाल्यामुळे पहुरजीरा येथील भाविकांची फाटाफूट झाली. यापैकी दोघे घरी परतले मात्र यातील श्रीराम झाडोकार हे अद्याप घरी पोहोचले नाहीत. ते सुध्दा घरी पोहोचतील मात्र सद्यातरी ते आले नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. *पहिल्यांदाच सत्संगाला जाणारे पागृत भयभीतपहुरजीरा येथील श्याम पागृत हे पहिल्यांदाच सतलोक आश्रमात सत्संगाला गेले होते.आश्रमाचा पहिलाच प्रवास अतिशय खडतर झाल्यामुळे ते भयभीत झाले. तर गावातील श्रीराम झाडोकार अद्यापही परतले नाहीत. प्राप्त माहितीनुसार ते परतीच्या मार्गावर असल्याचे समजते. मात्र, गावातील दोन भाविक परतल्यानंरही झाडोकार अद्याप न परतल्याने त्यांचे कुटुंबियांमध्ये चिंतेचे सावट आहे.