शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी चौघांना शिक्षा

By admin | Updated: July 22, 2014 23:38 IST

चुलत भावास मारहाण केल्याप्रकरणी आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने चारही आरोपींना प्रत्येकी एक महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली.

खामगाव : शेतातील कुंपनावरुन झालेल्या वादात सख्ख्या चुलत भावास मारहाण केल्याप्रकरणी आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने चारही आरोपींना प्रत्येकी एक महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली. सदरचा निकाल खामगाव न्यायालयाने आज २२ जुलै रोजी दिला असून आरोपी हे लाखनवाडा येथील रहिवासी आहेत. याबाबत हकीकत अशी की, तालुक्यातील लाखनवाडा बु. येथील श्रीकृष्ण यशवंत पांढरे हे १७ एप्रिल २00३ रोजी त्यांच्या शेतात जळालेल्या मोटारीचे काम करीत असताना त्यांना शे.सलीम व आत्माराम सोनाटकर हे मदत करीत होते. दरम्यान श्रीकृष्ण पांढरे यांच्या शेतातील काट्याचे कुंपन सौ.नंदा वसंत पांढरे ही काढीत होती. तेव्हा तीला कुंपन काढण्यास श्रीकृष्णने मनाई केली असता सौ.नंदा ही घरी गेली व तीने वसंत तुकाराम पांढरे, अनंता वसंत पांढरे, गोपाल वसंत पांढरे यांना शेतात घेऊन आली. या तिघांनी कुर्‍हाड, कोपळी व काट्यांनी श्रीकृष्णला मारहाण केली तर सौ.नंदा हिनेही चापटांनी मारहाण केली, अशा आशयाची तक्रार श्रीकृष्ण पांढरे यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनला दिली होती. तेव्हा हिवरखेड पोलिसांनी उपरोक्त चारही जणांविरुध्द अपराध नंबर ३९/0३, कलम ४४७, ३२५,३२३,३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाची आज २२ जुलै रोजी खामगाव न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले असता चारही आरोपींविरुध्द गुन्हा सिध्द झाला. त्यामुळे आरोपींना कलम ४४७ मध्ये प्रत्येकी ५00 रुपये दंड, कलम ३२३ मध्ये प्रत्येकी १ महिन्याची साधी शिक्षा, कलम ३२५ मध्ये प्रत्येकी १ महिना शिक्षा व प्रत्येकी ५00 रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवसाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी श्रीकृष्णला ३ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. सदरचा निकाल कोर्ट नं.३ चे न्यायाधीश जी.आर.ढेपे यांनी दिला. सरकारी पक्षाच्या वतीने अँड.अजय इंगळे यांनी काम पाहिले.