शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीमुक्त भारतासाठी मोटारसायकलव्दारे प्रचार

By admin | Updated: May 25, 2014 00:05 IST

औरंगाबादच्या युवकाने २0 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात मोटारसायकलव्दारे प्रचार अभियान सुरू केले आहे.

बुलडाणा : एचआयव्ही बाबत समाजात असलेल्या भ्रामक कल्पना व गैरसमज यामुळे या आजाराचे थैमान दिवसेंदिवस वाढतेच आहे. सर्वसामान्यांना याबाबत माहिती व्हावी व गैरसमज दूर व्हावेत, म्हणून औरंगाबादच्या आदेश आटोटे या युवकाने २0 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात मोटारसायकलव्दारे प्रचार अभियान सुरू केले आहे. हा युवक आज बुलडाण्यात आला असता त्याने आपल्या अभियानाची माहिती ह्यलोकमतह्णला दिली. संगीत शिक्षक असलेल्या आदेश आटोटे औरंगाबाद, पुणे येथील बालगृहात काम करीत असतांना एचआयव्हीबाबत जनजागृतीचे व्रत त्याने हाती घेतले. ६ वर्षाच्या कालावधीत तब्बल १२३ जणांचा एचआयव्हीने झालेला मृत्यू त्याने अनुभवला. या मृत्यूंमध्ये रूग्णांच्या बाबतीत असलेले गैरसमज हे सर्वात मोठे दुखणे असल्याची बाब त्याच्या लक्षात आल्याने त्याने गावागावात प्रचार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादमध्ये लोकसहभागातून आदेशला मोटारसायकल घेवून देण्यात आली. यावेळी कचरा उचलणार्‍या महिलांनीही कष्टाची रक्कम आदेशच्या हाती सोपवली. आदेश २0 मे पासून जालना, दे.राजा, चिखली अशा शहरांना व यामधील विविध गावांना भेटी देत आज बुलडाण्यात पोहोचला. उद्या नांदुरा, खामगांव मार्गे तो अकोल्यात दाखल होणार आहे. मुळचा मुर्तिजापूर येथील समशेरपूर येथील रहिवासी असलेला आदेश संपूर्ण महाराष्ट्र फिरून जागतिक एचआयव्ही दिन १ डिसेंबर रोजी औरंगाबादमध्ये परतणार आहे व तेथे या अभियानाचा समारोप होईल, असे तो म्हणाला.