जनता दरबारात कडाडले उर्जामंत्री

By Admin | Updated: April 25, 2017 20:07 IST2017-04-25T20:07:32+5:302017-04-25T20:07:32+5:30

बुलडाणा : जनता दरबारात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच कडाडले. शेतकऱ्यांन वीजजोडणी न देण्यासह कामात हलगर्जीपणा करणाऱ्या एका अभियंत्याला निलंबित करण्यात आले.

Power minister in public administration | जनता दरबारात कडाडले उर्जामंत्री

जनता दरबारात कडाडले उर्जामंत्री

एक अभियंता निलंबित, तर सहा अभियंत्यांची वेतनवाढ रोखली

बुलडाणा : वीजसमस्यांवर बोलाविलेल्या जनता दरबारात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच कडाडले. शेतकऱ्यांन वीजजोडणी न देण्यासह कामात हलगर्जीपणा करणाऱ्या एका अभियंत्याला निलंबित करण्यात आले. तर सहा अभियंत्यांनी वेतनवाढ रोखली.
राज्याचे ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २५ एप्रिल रोजी महावितरण व महापारेषणच्या पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व मंजुर झालेल्या कामांचे भूमिपूजन केले. तसेच यानंतर ग्राहकांच्या समस्या ऐकूण घेण्याकरिता जनता दरबार भरविण्यात आला. यावेळी मंचावर आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. आकाश फुंडकर, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, आ. संजय रायमुलकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले, महावितरणचे मुख्य अभियंता भादीकर यांची उपस्थिती होती. यावेळी उर्जामंत्र्यांनी ग्राहकांच्या समस्या ऐकूण घेत त्यावर तत्काळ संबंधित अभियंत्यांना जाब विचारण्यात आला. यादरम्यान २०१३ मधील शेतातील कृषीपंपाची वीज जोडणी न देणाऱ्या बुलडाण्याचे कार्यकारी अभियंता विजय जिजीलवार यांना

Web Title: Power minister in public administration