लोकसंख्या नियंत्रण काळाजी गरज : शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST2021-07-16T04:24:41+5:302021-07-16T04:24:41+5:30

याप्रसंगी प्रमुख वक्ते सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाचे समाजशास्त्राचे प्रा. मेघराज शिंदे हे होते. लोकसंख्या दिन साजरा करण्यामागचा ...

Population control needs care: Shinde | लोकसंख्या नियंत्रण काळाजी गरज : शिंदे

लोकसंख्या नियंत्रण काळाजी गरज : शिंदे

याप्रसंगी प्रमुख वक्ते सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाचे समाजशास्त्राचे प्रा. मेघराज शिंदे हे होते. लोकसंख्या दिन साजरा करण्यामागचा उद्देश समाजातील लोकांच्या प्रजनन आरोग्याकडे लक्ष देणे हा आहे; कारण हे आजारपण जगभरातील गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. जागतिक लोकसंख्या दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे जगभरातील लोकांचे आरोग्य, माता व बाळांचे आरोग्य व कुटुंब नियोजनाचे महत्त्व यांसारख्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रणासाठी लोकांना प्रोत्साहित करणे गरजेचे असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. प्रजनन आरोग्य व त्यातील सुधारणांमुळे प्रजनन दर कमी होईल. आपले वर्तमान व भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आलेली आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ग. ना. परिहार हे होते. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय दांदडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गणेश सावजी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

कुटुंब नियोजन महत्त्वाचे : परिहार

सुरक्षित, ऐच्छिक कुटुंब नियोजन मिळविणे हा मानवी हक्क आहे. तसेच लैंगिक समानता व स्त्रियांच्या सक्षमीकरणामुळे दारिद्र्य कमी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमात अधिक गुंतवणूक केल्यास आर्थिक विकासाला पुढे नेता येईल, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ग. ना. परिहार यांनी केले.

Web Title: Population control needs care: Shinde