शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय उलथापालथ

By admin | Updated: September 28, 2014 00:38 IST

बुलडाणा जिल्ह्यातही राजकीय उलथापालथचे पडसाद अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी समोर आले.

बुलडाणा: महायुती-आघाडीच्या फुटीनंतर सुरू झालेल्या राजकीय उलथापालथचे पडसाद आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी समोर आले. काँग्रेसच्या नेत्यांनी दुसर्‍या पक्षांसोबत केलेला घरोबा, एबी फॉर्मचा खेळखंडोबा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले.* राष्ट्रवादी : उमेदवारीसाठी धावाधावजळगाव जामोदच्या माजी नगराध्यक्ष डॉ.स्वाती वाकेकर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली त्यामुळे राष्ट्रवादीने ऐनवेळी धावाधाव करीत काँग्रेसचे प्रकाश ढोकणे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी दिली. मेहकरमध्ये अश्‍विनीं आखाडे यांच्या ऐवजी मंदाकिनी कंकाळ यांचे नाव सकाळी जाहीर झाले; मात्र ए.बी.फॉर्म कुणाजवळ हा गोंधळ दुपारपर्यंंंत कायम होता, अखेर अश्‍विनी आखाडे यांना ए.बी.फॉर्म देण्यात आला. मलकापूरचाही राष्ट्रवादीचा उमेदवार बदलणार, अशी अफवा होती; मात्र संतोष रायपुरे यांनाच ए.बी. फॉर्म मिळाला.* भाजपा : एबी फॉर्मचा गोंधळयुती तुटल्यानंतर उमेदवाराच्या शोधासाठी भाजपाला सर्वत्र धावाधाव करावी लागली. बुलडाण्यात अँड.व्ही.डी.पाटील हे उमेदवार जाहीर झाले व ते अर्ज भरण्याची तयारी करीत असतानाच योगेंद्र गोडे यांचे नाव समोर आले. त्यामुळे एबी फॉर्मचा काहीकाळ गोंधळ उडाला होता; मात्र गोडे यांना उमेदवारी मिळाली. अँड. पाटील हे सुद्धा रिंगणात आहेत.तर मेहकरमध्ये रिपाइं आठवले गटाच्या नरहरी गवई यांच्या गळयात उमेदवारीची माळ पडली. सेनेच्या कोटयातून जि.प.सदस्य असलेले गवई आता भाज पाच्या युतीमध्ये मेहकरचे उमेदवार ठरले आहेत.* शिवसेना : डमी उमेदवारांचे अर्जचिखली, खामगाव येथे शिवसेनेकडून दोन दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. चिखलीत जालींधर बुधवत व डॉ.प्रतापसिंग राजपूत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून खामगावातही माजी जिल्हाप्रमुख ज्ञानदेवराव मानकर व हरिदास हुरसाड हे रिंगणात आहेत. शिवसेनेने जळगाव जामोद मतदारसंघामध्ये शेगावच्या संतोष घाटोळ यांना उमेदवारी दिली आहे; मात्र त्यांच्या उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत कायम होता. उमेदवार बदलविल्या जाणार असल्याची चर्चा होती; मात्र घाटोळ यांची उमेदवारी कायम राहिली.* स्वाभिमानी भाजपासोबत महायुतीमध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महत्वाकांक्षेचा वारू अखेर शांत झाला आहे. चिखली या संघाच्या बालेकिल्ल्यात भाजपामध्ये असलेली उमेदवारीची प्रचंड स्पर्धा पार करीत सुरेश अप्पा खबुतरे यांनी उमेदवारीसाठी बाजी मारली त्यामुळे स्वाभिमानी बंडखोरी करणार अशी अटकळ होती परंतु या संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी माघार घेत भाजपासोबत राहण्याचे पत्रकार परिषदेत जाहिर केले.* शिंगणेंचा अर्ज नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तब्बल दोन दशकांपासून सिंदखेडराजा मतदारसंघाचे प्रतिनिेधीत्व केले आहे. १९९५ मध्ये अपक्ष आमदार म्हणून प्रथम विजयी झालेले डॉ.शिंगणे यांनी राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व सांभाळले. यावेळी ते पाचव्यांदा रिंगणात राहणार होते; मात्र त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारी निवड प्रक्रियेपासूनच अंतर राखले होते, त्यामुळे ते लढणार नाहीत, अशी चर्चा होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. डॉ.शिंगणे यांनी सिंदखेडराजा किंवा बुलडाण्यातही अर्ज दा खल केला नाही, त्यामुळे गेल्या २0 वर्षानंतर प्रथमच रिंगणाबाहेर राहिले आहेत.