वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

By Admin | Updated: August 21, 2015 01:27 IST2015-08-21T01:27:29+5:302015-08-21T01:27:29+5:30

७२ वर्षीय पादचा-याला धडक; गुन्हा दाखल.

The pedestrian killed by the blow of the vehicle | वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

मेहकर (जि. बुलडाणा): डोणगाववरून मेहकरकडे येणार्‍या एका वाहनाने ७२ वर्षीय पादचार्‍याला धडक दिल्याची घटना येथील गजानन महाराज मंदिरानजीक १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३0 वाजता घडली. यामध्ये पादचारी जागीच ठार झाला. शत्रुघ्न बळीराम पायघान (रा.कहाकर ता. शेनगाव जि. हिंगोली) हा एम.एच.३७ जे. २११ क्रमांकाचा टेम्पो घेऊन डोणगाववरुन मेहकरकडे भरधाव वेगात येत होता. डोणगाव रोडवरील गजानन महाराज मंदिरावरील विठ्ठल पांडुरंग सरोदे (७२) हे रस्त्याने जात असताना त्याना सदर टेम्पोने जबर धडक दिली. यामध्ये विठ्ठल सरोदे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शत्रुघ्न बळीराम पायघान यांच्याविरुद्ध मेहकर पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The pedestrian killed by the blow of the vehicle