शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘परमवीर चक्र’ विजेते तीन शूरवीर एकाच व्यासपीठावर

By admin | Updated: July 13, 2015 01:12 IST

गुरुवारी सत्कार; बुलडाणेकर होणार ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार.

बुलडाणा : देशाच्या रक्षणासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता तिरंग्याची शान राखण्यासाठी दुश्मनाशी दोन हात करून युद्ध जिंकणार्‍या जवानांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार ह्यपरमवीर चक्रह्ण प्रदान करून सन्मानित करण्यात येते. अशा परमवीर चक्राने सन्मानित तीन योद्धय़ांचा बुलडाण्यातील सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तिन्ही वीर देशात प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार असून, आपले अनुभव कथन करणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर मिलिंदकुमार बडगे यांनी दिली. बुलडाणा बसस्थानकासमोरील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात १२ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष टी.डी. अंभोरे पाटील, कमांडर अशोक राऊत, जिल्हा होमगार्ड निदेशक दीपक पाटील, शौर्यपदक प्राप्त रमेश बाहेकर उपस्थित होते. कमांडर बडगे पुढे म्हणाले की, परमवीर चक्र सन्मान मरणोत्तर देण्यात येत असतो; मात्र देशाच्या ३ सुपुत्रांना आपल्या शौर्याबद्दल जिवंतपणी हा सन्मान मिळाला आहे. त्यात ऑनररी कॅप्टन बाणासिंह रा. जम्मू काश्मीर, सुभेदार योगेंद्रसिंह यादव रा. उत्तरप्रदेश, तसेच नायब सुभेदार संजयकुमार रा. हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. सदर तिन्ही शूरवीर आतापर्यंंंत एकत्र आले नाहीत; मात्र बुलडाण्यातील सत्कार कार्यक्रमात तिन्ही शूरवीर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. बुलडाण्यात गुरुवारी तिन्ही शूरवीर दाखल होताच सर्वप्रथम हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. त्यानंतर शहरातील जयस्तंभ चौकात बुलडाणा नगरपालिकेच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर सहकार विद्या मंदिराच्या सभागृहापर्यंंंत खुल्या जीपमधून तिघांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देशाच्या तीन शूरवीरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी सैनिक कल्याण अधिकारी कमांडर बडगे यांनी केले. यावेळी तिन्ही शूरवीर आपले युद्धातील पराक्रमाविषयी अनुभव कथन करणार आहेत. कर्नल सुहास जतकर यांच्या प्रयत्नातून हा सोहळा बुलडाण्यात प्रथमच होत असल्याचे त्यांनी सांगितले.