शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात केवळ १८ हजार अपंगांनाच सवलतीचा लाभ

By admin | Updated: December 3, 2014 00:44 IST

आज जागतिक अपंग दिन : बुलडाणा जिल्ह्यात अपंगांच्या नशिबी सावत्रपणाची वागणूक.

बुलडाणा : अपंगत्वाचं जीणं जगणार्‍यांना समाजाच्या सहानुभूतीपेक्षाही हक्काचं विश्‍वासाचं पाठबळ हवं असतं. त्यांचे हक्क, अधिकार आणि सेवा-सुविधा याबाबत शासनस्तरावर जाणीवपूर्वक प्रयत्न होत असले तरी या प्रयत्नांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. विविध शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, बँका येथे नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते. आता प्रशासनाच्यावतीनेही अपंगांना अशीच वागणूक मिळत आहे. त्यामुळेच पाच वर्षात केवळ १८ हजार अपंगांनाच शासकीय सवलतीचा लाभ मिळू शकला आहे.जिल्ह्यात गत ५ वर्षात नोंदविण्यात आलेली अपंगाची संख्या १ लाख १८ हजार ७२३ आहे; मात्र आजपर्यंत केवळ १८ हजार ९३४ अपंगालाच विविध शासकीय सवलतींचा लाभ मिळत आहे. २0१३ मध्ये ११९१ अपंग व्यक्ती तर २0१४ मध्ये १७0७ अपंग विविध सवलतीसाठी प्राप्त ठरले. अपंगांचे खोट प्रमाणपत्र सादर करून शासकीय सवलती लाटणार्‍यांची संख्या मोठी आहे; मात्र खरे अपंग मात्र अद्याही या अपंगाना शासकीय योजना व सवलतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.युथ वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याकडून जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अपंग पुनर्वसन केंद्रात चालविले जाते. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या बुधवारी अपंग बोर्डाच्यावतीने येथे अपंगाची तपासणी करून त्यांना अपंग असल्याचे निश्‍चित करून त्यांना अपंगाचे प्रमाणपत्र देण्यात येते. येथून मिळणार्‍या अपंग प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना विविध योजनेचा लाभ मिळविता येते. अपंगाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सकाळपासून जिल्हाभरातून आलेल्या लोकांची अपंग पुनर्वसन केंद्राच्या परिसरात गर्दी असते.