शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

"स्वाईन फ्लू" ने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 20:09 IST

लोणार : स्वाइन फ्लू या प्राणघातक आजाराने तालुक्यातील रायगाव येथील काशिनाथ नामदेव नागरे (वय ५२ वर्षे) यांचा औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात ३१ मे रोजी मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : स्वाइन फ्लू या प्राणघातक आजाराने तालुक्यातील रायगाव येथील काशिनाथ नामदेव नागरे (वय ५२ वर्षे) यांचा औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना ३१ मे रोजी मृत्यू झाला. काशिनाथ नामदेव नागरे आजारी असल्यामुळे त्यांना प्रथम लोणार येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु आजार दुरूस्त न झाल्यामुळे त्यांना मेहकर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नागरे यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना नागरे यांचा मृत्यू झाला. त्यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनंत पबितवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगेश सानप व त्यांची चमू गावात पोहचली. त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी केली असता कोणीही तापाने व संशयित आढळून आले नाही. यामुळे त्यांनी माहिती घेतली असता मृतक काशिनाथ नागरे यांना प्रवासादरम्यान स्वाईन फ्ल्यू ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाची चमू रायगाव येथे तळ ठोकून असल्याचे डॉ. अनंत पबितवार यांनी सांगितले.

रायगाव येथे आम्ही सकाळीच जाऊन भेट देऊन गावाची पाहणी करत ग्रामस्थांची तपासणी मोहीम राबविली आहे. तरी घरात कोणी आजारी असल्यास त्वरित रुग्णालयात दाखवून उपचार घ्यावेत.- डॉ.अनंत पबितवार, तालुका आरोग्य अधिकारी.