शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, दोन गंभीर जखमी

By admin | Updated: August 19, 2014 23:17 IST

दहिहंडीचा कार्यक्रम आटोपून देऊळगावराजाकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अपघातात दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला

चिखली : दहिहंडीचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून चिखलीवरून देऊळगावराजाकडे जात असताना मलगी फाटानजिक अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या भिषण अपघातात दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्या दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ ऑगस्टच्या रात्री १ वाजेच्या सुमारास घडली. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.गोपाल गुलाबराव चव्हाण वय २४ रा.गांधीनगर चिखली, रामेश्‍वर सुधाकर टाकसाळ वय २३ आणि महेश डिगांबर कळसकर वय ३0 रा.पुंडलीकनगर चिखली हे तिघे येथील दहिहंडीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुचाकीने मित्राला प्लंबींग कामाची माहिती देण्यासाठी जात असताना मलगी फाट्यानजिक अज्ञात वाहनाने त्यांच्या हिरोहोंडा पॅशन प्रो क्र.क्रमांक एम.एच.२८ एजी २६६८ ला जोरदार धडक दिल्याने वाहनचालक गोपाल गुलाबराव चव्हाण या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर महेश देविदास कळसकर व रामेश्‍वर सुधाकर टाकसाळ हे दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने बुलडाणा येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूध्द चिखली पोलिसांनी कलम २७९, ३३६, ३३८, ३0४ अ. भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक जी.डी.भोई करीत आहेत.