अधिग्रहीत विहिरींची संख्या घटली

By Admin | Updated: June 16, 2014 00:52 IST2014-06-15T23:35:52+5:302014-06-16T00:52:23+5:30

यावर्षी समाधानकारक पावसामुळे एकही टँकर सुरू करण्याची वेळ आली नाही.

The number of acquired wells decreased | अधिग्रहीत विहिरींची संख्या घटली

अधिग्रहीत विहिरींची संख्या घटली

खामगाव : गेल्या वर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामना तालुक्यातील अनेक गावांना करावा लागला होता. या पाणी टंचाईमुळे प्रशासनाने १२ टँकरने तालुक्यातील विविध गावात पाणी पुरवठा केला होता. या साठी ५१ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. मात्र, यावर्षी समाधानकारक पावसामुळे एकही टँकर सुरू करण्याची वेळ आली नाही. केवळ दोन विहिरींचेच अधिग्रहण करण्यात आले. त्यामुळे शासनाचे लक्षावधी रुपये वाचला.
खामगाव तालुक्यात मागील वर्षी एकुण १२ टँकर व ५१ विहीर अधिग्रहण करून शासनाला लाखोचा फटका बसला होता. मागच्या वर्षी ज्या प्रमाणात पाणीटंचाई होती त्या प्रमाणात यावर्षी काहीच नाही यावर्षी एकही टँकर सुरू करण्यात आले नसून मागच्या वर्षी ५१ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. मात्र यावर्षी फक्त २ विहिरी अधिग्रहीत झाल्या. हा सर्व परिणाम मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसाचा असल्याचे दिसून येते. मोठय़ा प्रमाणात अवकाळी पावसामुळे आतापर्यंत अनेक नदीनाल्यांना पाणी राहिल्याने खामगाव तालुक्यात पाणीटंचाई भासली नाही. त्यामुळे शासनाचे लाखो रूपये वाचले.

Web Title: The number of acquired wells decreased