शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

न.प. उपाध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक पदासाठी रस्सीखेच

By admin | Updated: January 3, 2017 01:31 IST

उद्या होणार निवड; खामगावात शिवसेनेला खिंडार, संजय पुरवार भाजपात.

खामगाव, दि. २- नगरपालिका अध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर, आता बुधवारी उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी नगरसेवकांची रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये २७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. त्यानंतर २७ डिसेंबर रोजी नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला. आता नगर पालिकांमध्ये सत्ता स्थापन करून उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. खामगाव नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदासह स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी बुधवार, ४ जानेवारी रोजी पालिका सभागृहात सभा आयोजित करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल करण्यासाठी उद्याचा दिवस शेवटचा असल्याने सोमवारी सायंकाळी शहरात वेगाने राजकीय घडामोडी घडल्या. दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदाच्या तीन जागांसाठी तब्बल १२ उमेदवार शर्यतीत असून, सर्वाधिक रस्सीखेच ही भारतीय जनता पक्षात असल्याचे चित्र आहे.नवनियुक्त नगराध्यक्ष अनिता डवरे यांनी २७ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी स्वीकृत नगरसेवक पदासह उपाध्यक्ष पदासाठी ४ जानेवारी रोजी सभेची सूचना काढली. त्यानुसार बुधवारी सभा पार पडणार असल्याने, शहरातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून तब्बल १२ उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र सोमवारी सायंकाळी दिसून आले. स्वीकृत नगरसेवक पदासाठी मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांकडे नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सोमवारी दुपारीच शहरात प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडल्या. भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातील दोन स्वीकृत सदस्यांसाठी तब्बल १२ उमदेवार शर्यतीत असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. यामध्ये संदीप वर्मा, सुनील नवघरे, किशोर भोसले, सत्यनारायण थानवी, वैभव डवरे प्रबळ दावेदार मानले जात आहेत, तर भाजपकडूनच शहर अध्यक्ष संजय शिणगारे, अरुण आकोटकर, सुरेश घाडगे, अमोल बिचारे, राम मिश्रा, विजय उगले, नंदू कांडेकर, पप्पू शहाणे, सत्यनारायण थानवी इच्छूक असल्याचे दिसून आले. दरम्यान, भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांची सोमवारी दुपारी ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी एका स्थानिक हॉटेलात बैठक घेऊन स्वीकृत नगरसेवक पदाच्या उमदेवारांसंदर्भात चर्चा केली.या बैठकीला नगराध्यक्ष अनिता डवरे, गटनेते राजेंद्र धनोकार, ओंकारआप्प्पा तोडकर, भाजपाचे जिल्हाचिटणीस चंद्रशेखर पुरोहित, शहराध्यक्ष संजय शिणगारे, शहर सरचिटणीस किशोर भोसले, शेखर कुळकर्णी, अँड. रमेश भट्टड, जान्हवी कुळकर्णी, युवा मोर्चा शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष पवन गरड, शहर चिटणीस गणेश जाधव, सुभाष इटनारे, पवन शर्मा, नीलेश देशमुख भाजपाचे शहराचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. अखेर संजय पुरवार पालिकेचे नवे उपाध्यक्ष*शिवसेना नगरसेवक तथा माजी विधानसभा संपर्कप्रमुख संजय उपाख्य मुन्ना पुरवार यांनी सोमवारी घडलेल्या राजकीय वेगवान घडामोडीत आपल्या शेकडो सर्मथकांसह अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश घेतला. त्यामुळे खामगाव नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाला आहे. *जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, आ. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत, संजय पुरवार आपल्या शेकडो सर्मथकांसह भाजपच्या तंबूत दाखल झाले. त्यामुळे शिवेसेनेच्या एका नगरसेवकाला उपाध्यक्षपद देण्याचा तांत्रिक पेच आपोआप सुटला आहे. दरम्यान, भाजपात प्रवेश करतेवेळी पुरवार यांचे ना. भाऊसाहेब फुंडकर, आ. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवक यांनी त्यांचे स्वागत केले.