शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

खामगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या इलेक्ट्रिक ऑडिटला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 10:49 AM

गत दोन वर्षांपासून रुग्णालयातील ऑडिटकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील इलेक्ट्रिक ऑडिटकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. गत दोन वर्षांपासून रुग्णालयातील ऑडिटकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. दरम्यान, रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) अमरावती यांच्याशी उपजिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने पत्रव्यवहार करण्यात आल्याचेही ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे. सामान्य रुग्णालयातील इलेक्ट्रिक ऑडिटकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे गत अनेक वर्षांपासून कानाडोळा असल्याचे उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील पत्रव्यवहारावरून दिसून येते. विद्युत देखभाल दुरुस्तीकडेही संबंधितांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. रुग्णालयात विद्युत वायर सुस्थितीत असल्यातरी डाटा केबल लोंबकळलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे. 

पाहणीत काय आढळले ?खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्वच वाॅर्डातील इलेक्ट्रिक वायरची फिटिंग सुस्थितीत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आलेे. दरम्यान, रुग्णालयातील विविध वाॅर्डासाठी ३५ फायर एक्स्टिंग्यूसेर आहेत. हे सुस्थितीत असले तरी, फायर अलार्म सिस्टीमचा रुग्णालयात अभाव आहे.

ऑडीट न करण्यास जबाबदार कोण ? उपजिल्हा सामान्य रुग्णालयात इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) अमरावती यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इलेक्ट्रिक ऑडिट अद्यापही करण्यात आलेले नाही.

खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील इलेक्ट्रिक वायर सद्य:स्थितीत चांगल्या आहेत. शॉर्टसर्किटसंदर्भात कोणताही अपघात अद्याप येथे घडलेला नाही. रुग्णालयात फायर ऑडिटसंदर्भात अमरावती येथील सा.बां. विभाग (विद्युत) यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. - डाॅ.निलेश टापरे,निवासी वैद्यकीय, अधिकारी, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावhospitalहॉस्पिटल