शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा येथील उड्डाण पुलाचा प्रश्न अधांतरीच!

By admin | Updated: May 19, 2014 00:45 IST

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला येथील जळगाव जामोद रोडवरील उड्डानपुलाचा प्रश्न अधांतरीच आहे.

नांदुरा : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला येथील जळगाव जामोद रोडवरील उड्डानपुलाचा प्रश्न अधांतरीच आहे. नागपूर -मुंबई हा रेल्वेमार्ग नांदुरा शहराच्या मध्यवस्तीमधून जातो. शहराच्या एका भागातून दुसर्‍या भागात जाण्याकरिता रेल्वेमार्ग ओलांडून जावे लागते. रेल्वे अपघात घडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने जळगाव जामोद रोडवर रेल्वेचे फाटक लावलेले आहे. रेल्वे गाडी आली की, फाटक बंद करण्यात येते व गाडी निघून गेल्यावर फाटक उघडून शहराच्या वाहतुकीसाठी मोकळे करण्यात येते. दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे शहराची वाहतूक वाहन संख्या वाढली आहे. दुसरीकडे रेल्वेच्या गाड्यांची संख्या सुध्दा मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रेल्वे फाटक जास्तीत जास्त प्रमाणात बंदच राहते. यामुळे त्या रोडवर असलेली वाहतूक नेहमीच खोळंबलेली राहते. रेल्वे गेटच्या काही अंतरावरच नागपूर मुंबई हायवे आहे. रेल्वे गेट बंद असले की, त्या रोडवर वाहनांची लांबच लांब रांग लागते व ती हायवेवर येते. त्यामुळे अनेक वेळा हायवेची वाहतूक सुध्दा विस्कळीत होते. यामुळे या सर्व वाहतुकीचा शहरातील वाहतुकीवर सुध्दा परिणाम होते. रेल्वे गेटच्या काही अंतरावर पोलिस वसाहत बांधण्यात आली आहे. ठाणेदारासह संपूर्ण पोलिस स्टॉप आज त्या वसाहतमध्ये राहत आहे. पोलिसांना सुध्दा पोलिस स्टेशनमध्ये जाण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडून जावे लागते. शहरात एखादी अप्रिय घटना घडल्यास पोलिस घटना स्थळी बंद गेटमुळे वेळेवर पोहचू शकत नाही. एवढेच काय तर या परिसरात किंवा या रोडवर एखादा अपघात झाला किंवा एखादा अपघात झाला किंवा एखाद्याला तातडीने उपचाराची गरज असल्यास त्याला सुध्दा या बंद गेटमुळे वेळेवर उपचार मिळू शकत नाही. यासह इतरही अनेक प्रकारचा त्रास या गेटमुळे होत आहे. रावेर लोकसभा मतदार संघाच्या नवनियुक्त खासदार रक्षा खडसे यांची सासरे विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना सुध्दा या बंद गेटचा त्रास सहन करावा लागला व निवडणूक प्रचार काळात तब्बल विस मिनीट त्यांना बंद गेटसमोर उभे राहून ते उघडण्याची प्रतिक्षा करावी लागली. यावेळी काही स्थानिक नागरीकांच्या आपसातील उड्डानपुलाबाबतच्या चर्चा त्यांच्या कानी पडल्या व त्या त्यांनी नांदुरा येथील एका सभेत सांगितल्या व उपस्थितांना उड्डान पुलाचा प्रश्न मी निकाली काढीन असे आश्‍वासन दिले. यामुळे शहर वासियांच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांच्याकडून उड्डान पुलाबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.