शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

मतदार यादीतून ४४ हजार नागरिकांची नावे वगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2021 10:42 AM

The names of 44,000 citizens were omitted from the voter list : मतदारांना स्थलांतरीत समजून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: वारंवार सुचना तथा गृहभेटी देऊनही जिल्ह्यातील ५३ हजार २२५ मतदारांपैकी ४४ हजार ६४६ मतदारांनी त्यांची छायाचित्र मतदार यादीसाठी निवडणूक विभागाकडे न दिल्यामुळे अशा मतदारांना स्थलांतरीत समजून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे.त्यामुळे १५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या २० लाख ५४ हजार ३८४ मतदारांच्या अंतिम यादीतून ही नावे  निघणार आहे.  दरम्यान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी केलेले आवाहन आणि काही गृहभेटी दिल्यानतंर ८ हजार ५१४ मतदारांनी त्यांचे छायाचित्र मतदार यादीसाठी दिल्याने ते थोडक्यात बचावले आहे. दरम्यान ही ४४ हजार ६४६ नावे आता वगळण्यात आल्यामुळे आगामी पालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे एकट्या बुलडाणा विधानसभा मतदार संघातील तब्बल १७ हजार ९३९ मतदारांची नावे यामधून वगळल्या गेली आहेत. त्याचा सर्वच राजकीय पक्षांना येत्या काळात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. रामामुर्ती यांच्या निर्देशानुसार तत्कालीन निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, भूषण अहिरे यांनी तसेच उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांनी हे कामकाज केले. एक प्रकारे संबंधित ४६ हजार ६४६ जणांना स्थलांतरीत गृहीत धरून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत. येत्या काळात पालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. मात्र आता ही नावे वगळल्यामुळे स्थानिक राजकारणावरही याचे काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार सांगूनही अनेकांनी त्यांची छायाचित्रे दिली नव्हती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग