शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड केंद्रावर अनागोंदी कारभार

By admin | Updated: March 22, 2017 01:53 IST

५७ टोकन रद्द; व्यापा-यांना दिलेल्या टोकनाविरोधात शेतकरी पोलिसात.

शेगाव, दि. २१- नाफेडच्या तूर खरेदी केंद्रवारील अनागोंदी कारभाराविरोधात शेतकर्‍यांनी मंगळवारी आवाज उठविला. शेतकर्‍यांचा तुरीचा माल जैसे थे पडून असताना व्यापार्‍यांच्या आलेल्या मालाला टोकन दिल्या जात असल्याचा आरोप करीत शेतकरी पोलीस स्टेशनला दाखल झाले. त्यामुळे शेगावातील तूर खरेदी केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.शेगाव येथील खामगाव रोडवरील स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्डमध्ये शासनाच्या नाफेड केंद्रामार्फत तूर खरेदी सुरू आहे. खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या देखरेखीखाली तूर खरेदीची प्रक्रिया सुरू आहे; मात्र मागील २0 ते २५ दिवसांपासून नंबर लावून बाजार समितीच्या आवारात शेतकर्‍यांची तूर पडलेली असताना मागून येणार्‍या व रात्रीच्या वेळात केंद्रात दाखल होणार्‍या तुरीचे मोजमाप लगेच होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे. सोमवारी या शेतकर्‍यांनी बाजार समितीचे सचिव पुंडकर यांना घेराव घालत या बाबत जाब विचारला. यावरून समितीने सोमवारी केंद्रात ठेवलेल्या तुरीच्या पोत्यांचा पंचनामा केला. या पंचनाम्यामध्ये अनागोंदी कारभार असल्याचे आढळून आले. त्यावरून २७ फेब्रुवारी २0१७ रोजी वाटप करण्यात आलेले टोकन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शेगावच्या या केंद्रावर रात्रीच्या वेळी व्यापार्‍यांच्या मालाची आवक सुरू आहे. शिवाय त्यांच्या तुरीला लगेच टोकन दिल्या जात असून त्यांचे मोजमापही लवकर होत आहे, असा आरोप करीत मंगळवारी २0 ते २५ शेतकरी तक्रार देण्यासाठी शहर पोलीस स्टेशनला दाखल झाले होते. या बाबत शेतकर्‍यांची दखल घेत ठाणेदार यांनी शेतकर्‍यांना सोबत घेऊन नाफेडच्या केंद्रावर पोहचून चौकशी करीत संबंधितांची कानउघाडणी केली. सायंकाळपर्यंत केंद्रावर हा गोंधळ सुरूच होता.शेगावच्या केंद्रावर शेतकर्‍यांचा माल टोकनप्रमाणे न घेता रात्रीच्या वेळेस व्यापार्‍यांचा आलेला माल मोजल्या जात आहे. या भ्रष्टाचारामध्ये बाजार समिती आणि खरेदी-विक्रीचे दोन कर्मचारी यांची मिलीभगत आहे.- गजानन कोकाटे तूर मालक, शेतकरी