नगरपालिकेनेच रोजगार हिरावले

By Admin | Updated: December 22, 2014 00:42 IST2014-12-22T00:42:47+5:302014-12-22T00:42:47+5:30

लघू व्यावसायिकांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार.

The municipal corporation only employed | नगरपालिकेनेच रोजगार हिरावले

नगरपालिकेनेच रोजगार हिरावले

शेगाव (बुलडाणा) : शेगाव शहरात मागील पंधरा दिवसांपासून रेल्वे स्टेशन ते मंदिर या मुख्य मार्गावरील लघू व्यावसायिकांना पालिकेने रोजगारावरून उठविल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनातून लघू व्यावसायिकांनी झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागितली आहे. शेगाव शहरात ८ डिसेंबरपासून नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम न्यायपालिकेच्या आदेशाप्रमाणे राबवित असल्याचे नगरपालिका प्रशासन सांगत असले तरी, मोहीम राबविताना कोणत्याही प्रकारची सूचना न देता अतिक्रमण हटविण्यात आल्याने आमच्या मालाची मोठय़ा प्रमाणात नासधूस झाली आहे. दरम्यान, गरज नसताना फलक मोडणे, समोरचे शो गजराजने तोडणे, बोर्ड जब्त करणे यासारखे प्रकार सतत अतिक्रमण या नावाने चालू ठेवले. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून हे किरकोळ व्यापारी नगरपरिषद कराचा दैनंदिन भरणा न.प. प्र ितनिधीजवळ करतात व आपले व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. शेगाव विकास आराखड्यामध्ये या मार्गाचे रुंदीकरण होऊन पुनर्बांधणी करण्यात आल्याने किरकोळ व्यावसायिकांकडून रहदारीला कुठलाही अडथळा निर्माण होत नाही.

Web Title: The municipal corporation only employed