शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 04:51 IST

वानखेडे स्टेडियम येथे शनिवारी मुंबई इंडियनचा आयपीएल सामना पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. पाणी देण्याच्या बहाण्याने स्वयंसेवकानेच तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर तो तेथून पळत असताना तरुणीने त्याचा पाठलाग केला.

मुंबई - वानखेडे स्टेडियम येथे शनिवारी मुंबई इंडियनचा आयपीएल सामना पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. पाणी देण्याच्या बहाण्याने स्वयंसेवकानेच तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर तो तेथून पळत असताना तरुणीने त्याचा पाठलाग केला. तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे स्टेडियमध्ये खळबळ उडाली होती.जनराज सतनामी (२६) असे अटक आरोपीचे नाव आहे. तक्रारदार २२ वर्षीय तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. शनिवारी ती मित्र-मैत्रिणींसोबत वानखेडे स्टेडियम येथे मुंबई इंडियनचा आयपीएल सामना पाहण्यासाठी गेली होती. सामना संपल्यानंतर रात्री सव्वाआठच्या सुमारास निघताना ती सचिन तेंडुलकर स्टॅण्डमध्ये गेली. त्याच दरम्यान सतनामी हा स्वयंसेवक पाणी देण्यासाठी तिच्याकडे आला. तिने नकार दिला. तरीही तो पाणी देण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. तिने दम दिल्यानंतर तो निघून गेला. त्यानंतर पुन्हा पाठीमागून येऊन तो तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. तिने आरडाओरड करताच त्याने पळ काढला. तिनेही त्याचा पाठलाग केला. पुढे उभ्या असलेल्या पोलिसांना त्याला पकडायला सांगितले.पोलिसांनी त्याला पकडून मरिन ड्राइव्ह पोलिसांच्या ताब्यात दिले. सतनामी हा मशीद बंदर येथील रहिवासी आहे. मरिन ड्राइव्ह पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबई