प्लॉट घेण्यासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:25 IST2021-06-06T04:25:55+5:302021-06-06T04:25:55+5:30

देऊळगाव राजा : लग्नात हुंडा कमी दिला म्हणून प्लॉट घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी करून विवाहितेचा शारीरिक ...

Marital harassment to take the plot | प्लॉट घेण्यासाठी विवाहितेचा छळ

प्लॉट घेण्यासाठी विवाहितेचा छळ

देऊळगाव राजा : लग्नात हुंडा कमी दिला म्हणून प्लॉट घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सिंदखेड राजा येथील अकराजणांविरुद्ध ४ जूनराेजी देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

देऊळगावराजा येथील भारती हिचा विवाह सिंदखेड राजा येथील राजे कुटुंबात झाला़. विवाहानंतर काही दिवस सुखाचे गेले़. त्यानंतर सासरकडच्या मंडळींनी लग्नात हुंडा कमी दिला म्हणून प्लॉट घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला़. त्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आला़. सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून पीडित विवाहितेने पोलीस ठाणे गाठले़. या प्रकरणात भारती गोविंदा राजे (रा़ सिंदखेड राजा, हल्ली मुक्काम देऊळगाव राजा) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोविंदा राजे, बाबूराव राजे, मुक्ताबाई राजे, आनंदा बाबूराव राजे, शिवाजी बाबूराव राजे, संभाजी अण्णा राजे, कैलास अण्णा राजे, अन्नपूर्णा आनंदा राजे, गंगूबाई संभाजीराजे, जानवी कैलास राजे, दुर्गाबाई अण्णा राजे (सर्व राहणार सिंदखेड राजा) यांच्याविरुद्ध विवाहितेस मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी हुंडाप्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे़. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तुळशीदास गुंजकर करीत आहेत़.

Web Title: Marital harassment to take the plot