शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Vidhan Sabha 2019: खामगाव मतदारसंघात तिहेरी लढतीची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 1:27 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.

खामगाव: खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पार्टीकडून बुलडाणा येथे इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये विद्यमान आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर हे मुलाखत देणारे एकमेव उमेदवार होते. दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ दिसत आहे. काँग्रेसतर्फे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा हे जरी तिकिटावर दावा करीत असले तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अमरावती विभागीय समन्वयक धनंजय देशमुख व बुलडाणा जिल्हा काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहाण हे सुद्धा काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यासाठी तयारी दर्शवली आहे. पक्षक्षेष्ठींनी संधी दिल्यास निश्चित निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यादृष्टीने त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न सुरु केले आहेत.याशिवाय तेजेंंद्रसिंह चौहाण यांच्याप्रमाणेच त्यांच्या सुविद्य पत्नी राजकुमारी चौहाण यांनी सुद्धा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे मुलाखत दिली आहे. याशिवाय हार्दीक पटेल यांचे निकटवर्तीय तथा किसान क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष मंगेश भारसाकळे यांनी देखील निवडणूकीसाठी तयारी सुरु केली असून काँग्रेसतर्फे मुलाखत दिली आहे. काँग्रेसमधील उमेदवारांच्या स्पर्धेमुळे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असल्याची चर्चा रंगली आहे.

‘वंचित’चा उमेदवार ठरणार निर्णायक!वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने हे सुद्धा खामगाव मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. वंचिततर्फे जर अशोक सोनोने निवडणूक रिंगणात असले तर काँग्रेसच्या उमेदवारांसमोर अडचणी वाढू शकतात. त्यामुळे ‘वंचित’कडून अशोक सोनोने उभे राहत असल्यास निवडणूक लढवायची की नाही ? हा विचार काँग्रेसचे उमेदवार करीत आहेत.राष्ट्रवादीचा उमेदवारही तयारीत !माजी आमदार नाना कोकरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. ते १९९०-९५ व १९९५-९९ या कार्यकाळात आमदार राहिलेले आहेत. त्यांनी दोन्ही भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढविली आहे. स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबत खटके उडाल्यानंतर त्यांनी भाजपा सोडली. यावेळेस त्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019khamgaon-acखमगाव