राष्ट्रीय शूटिंग बाॅल स्पर्धेचे महाराष्ट्र संघाला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:41 IST2021-09-04T04:41:38+5:302021-09-04T04:41:38+5:30

अमडापूर : गाजियाबाद येथे ३० ऑगस्ट राेजी पार पडलेल्या ४०व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय शूटिंग बाॅल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ...

Maharashtra team wins National Shooting Ball Championship | राष्ट्रीय शूटिंग बाॅल स्पर्धेचे महाराष्ट्र संघाला विजेतेपद

राष्ट्रीय शूटिंग बाॅल स्पर्धेचे महाराष्ट्र संघाला विजेतेपद

अमडापूर : गाजियाबाद येथे ३० ऑगस्ट राेजी पार पडलेल्या ४०व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय शूटिंग बाॅल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने हरियाणा संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या संघात असलेल्या अमडापूरच्या मुलींनी चमकदार कामगिरी करीत विजयात माेलाचा वाटा उचलला.

आपल्या गटातील सर्वच सामने एकतर्फी जिंकून महाराष्ट्र संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला हाेता. उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगाल, तर उपांत्य फेरीत पंजाब संघाचा एकतर्फी पराभव करत संघाने अंतिम फेरीत धडक दिली. महाराष्ट्र संघाने हरियाणा संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. कर्णधार तन्वी खाजभागे हिला हिरो ऑफ द टूर्नामेंटचा खिताब देऊन गौरविण्यात आले. यावेळी संघासोबत व राज्य संघटनेचे खजिनदार शकील काझी व शूटिंग बाॅल फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य अतुल निकम प्रमुख मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते. त्यांच्या सोबत त्र्यंबक आप्पा राजे, प्रशिक्षक चंद्रकांत तायडे, शरद खाजभागे, प्रशांत पवार, कुणाल काळे यांचे संघांना मार्गदर्शन लाभले. विजयी संघाला शूटिंग बाॅल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अंजुल अग्रवाल व महासचिव रवींद्र तोमर यांच्या हस्ते रोख रु, ११ हजार रुपयांचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली.

Web Title: Maharashtra team wins National Shooting Ball Championship