शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

लोणार शहरातील पाणी प्रश्न सुटणार

By admin | Updated: June 21, 2014 00:01 IST

लोणार पाणीपुरवठा योजना: जलशुद्धीकरण केंद्राच्या भुमीपूजनप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री मोघेयांचे वक्तव्य

लोणार : शहरातील नागरिकांनी नगर पालीकेत काँग्रेस पक्षाला संधी दिली. त्यामुळे विकासाकरीता सर्वतोपरी सहकार्य करणार तसेच जलशुद्धीकरण केंद्रामुळे शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.
लोणार शहराच्या कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्राच्या भुमिपूजन व आ.अमित झनक यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय अंभोरे हे होते. तर आ.राहुल बोंद्रे, आ.अमित झनक, श्याम उमाळकर, लक्ष्मणराव घुमरे, बलदेवराव चोपडे, तालुकाध्यक्ष भगवानराव सानप, वसंतराव देशमुख, मेहकर नगराध्यक्ष कासम गवळी, लोणार नगराध्यक्षा रंजना राजेश मापारी, उपाध्यक्ष शे.समद, शहराध्यक्ष शांतीलाल गुगलीया, माजी नगराध्यक्ष खान, साहेबराव पाटोळे, प्रा.गजानन खरात, गोपाल तोष्णीवाल, पंचायत समिती सभापती सुनिल केंद्रे, सदस्य ज्ञानेश्‍वर चिभडे, तालुका सनियंत्रण समितीचे अध्यक्ष राजेश मापारी, मुख्याधिकारी घोलप, अभियंता अजय हाडोळे यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना ना.मोघे म्हणाले की, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, शहराला लवकरच शुद्ध पाणी मिळणार असून, नगराध्यक्ष पती राजेश मापारी यांनी पाणीप्रश्न सोडविण्याकरीता पुढाकार घेतला. काँग्रेस पक्षाला नागरिकांनी मोठी साथ दिली, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश मापारी यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा सौ.रंजना मापारी व राजेश मापारी यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे व रिसोड मतदार संघाचे नवनिर्वाचीत आ.अमित झनक यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.गजानन खरात यांनी केले.