शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

भाजीत निघाल्या अळ्या !

By admin | Updated: November 19, 2014 01:05 IST

खामगाव येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहामधील घटना.

खामगाव (बुलडाणा): येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थी जेवण करीत असताना काही विद्यार्थ्यांना वांग्याच्या भाजीत अळ्या दिसून आल्या. यानंतर ही भाजी फेकून देत वादावर पडदा टाकण्यात आला. ही घटना आज १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १0.३0 वाजेच्या सुमारास घडली. खामगाव येथील गो.से. महाविद्यालयाच्या पाठीमागे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. येथे ११0 विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली असून, शैक्षणिक सत्र संपेपर्यंत वसतिगृह सुरु असते. वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्यांना दरमहा ५00 रुपये वैयक्तिक खर्चासाठी मिळतात. प्रतिविद्यार्थ्याच्या जेवणाकरिता प्रतिमाह ३३00 रुपये दिले जातात. सद्यस्थितीत हे वसतिगृह गणेशपूर येथील आदिवासी महिला बचत गटामार्फत कंत्राट पद्धतीने चालविले जात आहे. बचत गटाच्या सविता धंदर या कंत्राट चालवितात. विद्यार्थ्यांना दररोज वरण, भात, भाजी, पोळी, सकाळी दूध, फळे, नाश्ता तसेच आठवड्यातून एक दिवस नॉनव्हेज दिले जाते. आज मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी नित्यानियमाने जेवण करीत असताना गोकुल चव्हाण व सुबोध राठोड या विद्यार्थ्यांना वांग्याच्या भाजीत अळ्या असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी तत्काळ वसतिगृह अधीक्षक ए.के.बोरकर यांना तत्काळ ही घटना निदर्शनास आणून दिली. यानंतर सदर भाजी फेकून दुसरी भाजी देण्यात आली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला.